जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे एक दिवसीय धरणे आंदोलन
शहरातील भुयारी गटार पाईप लाईनचे काम,रस्ते दर्जाहीन: भंडारा न.प.चा दुर्लक्षीत कारभार: नागरिक त्रस्त
भडारा:-भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ३० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरिल त्रिमृती चौक येथे भंडारा नगरपरिषद प्रशासनाकडून सुरु असलेल्या शहरातील भुयारी गटार पाईप लाईनचे काम,रस्ते दर्जाहीन व कासव गतीने होत असुन, वार्डातील वा चौकस्थित नागरिकांची अवागमण असलेल्या रस्त्यांची स्थिती दुरावस्था झाल्याने, नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे, जिल्हा प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी इंटकचे जिल्हाध्यक्ष धनराज साठवणे यांच्या नेतृत्वात
एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. व विषय संदर्भाने शिष्टमंडळाकडून भंडाराचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी धनराज साठवणे यांनी भाषणातून शहरांमध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्था,कार्यरत असूनही शहराचा विकास दिशाहीन, शहर नेतृत्व हीन अवस्थेमध्ये पोहोचला आहे. तसेच नगराध्यक्ष नसल्याने, जबाबदारीचे भान नाही, शहरात आमदार असून त्यांना शहराच्या सोयी सुविधांपेक्षा निवडणुकांचे वेध लागलेले असल्याचे दिसुन येत आहे , परिणामी भर पावसाळ्यात जनतेमध्ये आक्रोश आहे, जनप्रतिनिधीं फक्त मतांची बिधागी जमवण्यात मग्न असुन, जनप्रतिनिधी अंधभक्त आणि स्वार्थ ठेवत भ्रष्टाचाराच्या स्पर्धेमध्ये कोण वरचढ ठरतो की काय अशी परिस्थिती आज शहरांमध्ये असुन नगर परिषद प्रशासनावर कुणाचाच वचक आणि नियंत्रण राहिलेले नाही, परिणामी नगर परिषदेचे प्रशासक हे अनियंत्रित कार्यभार हाकलत असल्याचा आरोप करित त्यांनी तोफ डागली. दरम्यान अन्य पदाधिकाऱ्यांनी सुद्धा भाषणणातून शहराचा विकास नाही तर भकास परिस्थितीबात प्रकाश टाकून टिकास्त्र सोडले. या धरणे आंदोलनात भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेवटी शीष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून धरणे आंदोलनाची सांगता झाली.