सहकाऱ्यासोबत अनैसर्गिक संबंधाचा अट्टाहास जीवावर बेतला

सध्या मध्यमवयीन लोकांना काय झाले आहे कोणास ठाऊक ? सून नातवंडाचे झालेले हे म्हातारे अजब वागत असल्याचे समोर येत आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या अश्लील क्लिप्स किंवा इंटरनेट वर उपलब्ध होणारे साहित्य या मागील कारण आहे किंवा आणखी काही हे शोधणे अगत्याचे झाले आहे.
अंबरनाथ / नवप्रहार न्यूज नेटवर्क
एका अर्ध्यावयाच्या व्यक्तीने आपल्या सहकाऱ्याला दारू पाजण्याच्या बहाण्याने घरी आणले त्याला दारू पाजली आणि त्याच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने सहकारी इतका चिढला की त्याने त्याची गळा चिरून हत्या केली. महत्वाचे असे की औषधी शास्त्र अभ्यासक्रमात पास करून आमीः देत एका 55 वर्षीय प्राध्यापकाने विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.”
अंबरनाथच्या चिखलोली पाड्यातील मगर चाळीत कृष्णानंद मुनियन राहत होता. तो एमआयडीसीतील एका कंपनीत फेब्रिकेशनचे काम करत होता. रविवारी रात्री कंपनीतून येताना त्याने कंपनीतील एका सहकाऱ्याला दारू पाजण्याच्या निमित्ताने घरी आणले. तसेच दारू पिऊन झाल्यानंतर उशीर झाल्याने तिथेच मुक्काम करण्यास सांगितले. यानंतर रात्रीच्या सुमारास कृष्णानंद याने या सहकाऱ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या या सहकाऱ्याने त्याच्याच घरातील चाकू घेऊन कृष्णानंद याचा गळा चिरला आणि तिथून निघून गेला.
सकाळी कृष्णानंदच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने पाणी भरण्यासाठी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याने दार उघडले नाही. बराच वेळ दार उघडत नसल्यामुळे अखेर दार तोडून घरात प्रवेश केला असता कृष्णानंदचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती देताच शिवाजीनगर पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी भाव घेतली. यानंतर काही वेळातच संशयित आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार कृष्णानंद याने अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याने चिडून त्याने ही हत्या केल्याची कबुली दिली.