सामाजिक

जीवनसेतू जलमित्र आपत्ती बचाव दलाने गाईला दिले जीवनदान

Spread the love

मोर्शी / ओंकार काळे

दिनांक 02/10/2024 रोजी दुपारी मोर्शी येथील पाळा सालबर्डी रोड वरील जीवनसेतू जलमित्र आपत्ती बचाव दल यांना शेतातील शेतकऱ्याचा कॉल आला की येथे आमच्या शेताच्या बाजूला बेवारस गाय गड्ड्यामध्ये गंभीर अवस्थेत पडली आहे. तशीच माहिती मिळता जीवनसेतू जलमित्र आपत्ती बचाव दलाचे चमू सुरज धुर्वे, चंदन ठाकूर, विवेक सावरकर, प्रियांशू तायवाडे, प्रतीक खवले, तिथे पोहोचले व त्या गाईची पाहणी केली तेव्हा ती गाय एका गड्ड्या मधे गंभीर अवस्थेत पडली होती. त्यावेळी त्या गाईला स्थानिकांची मदत घेऊन बेल्ट व रोपच्या सहाय्याने सुरक्षितपणे गड्याबाहेर काढले व त्या गाईला तिच्या मालकांच्या स्वाधीन केले. येवढ्या तत्परतेने मुक्या प्राण्यांचा जिव वाचवल्या बद्दल सर्व जीवनसेतु जल मित्र आपत्ती बचाओ दलाचे कौतुक होता आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close