एस ओ एस च्या विद्यार्थ्यांची जवाहर सुतगिरणीला शैक्षणिक भेट
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शैक्षणिक संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी जळगाव आर्वी येथील जवाहर सहकारी सूतगिरणीला शैक्षणिक भेट दिली.शैक्षणिक भेट ही विद्यार्थ्यांसाठी वर्गाबाहेर शिकण्याची उत्तम संधी आहे. हे त्यांना विविध संस्कृतींचा अनुभव घेण्याची, नवीन ठिकाणे एक्सप्लोर करण्याची आणि वास्तविक जीवनातील परिस्थितींमध्ये लागू करू शकणारे व्यावहारिक ज्ञान मिळवण्याची संधी देते. या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची क्षितिजे विस्तृत करणे आणि त्यांचा शिकण्याचा अनुभव वाढवणे आणि उद्योगाच्या उत्पादन प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता. सर्व विद्यार्थ्यांनी विविध विभागांना भेटी दिल्या. सर्व विद्यार्थ्यांना उद्योगातील उत्पादन प्रक्रियेविषयी जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती.
उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. यावेळी जवाहर सहकारी सूतगिरणीचे उपाध्यक्ष विजयराव उगले, महाव्यवस्थापक के. एन. राजेंद्रन, एसक्यूसी मॅनेजर संतोषकुमार सिंग, स्टोअर इन्चार्ज अश्विन देशमुख, प्रशासकीय अधिकारी सूरज घोडेला, धीरज चौधरी, गजुभाऊ चौधरी व सर्व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका के.साई नीरजा, वर्गशिक्षक नितीन श्रीवास, विश्वास हिंगवे यांच्या मार्गदर्शनाखाली या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.