Uncategorized

जवर्डी शेत शिवारात बैलाचा शॉक लागून मृत्यु;शेतकऱ्याचे नुकसान

Spread the love

 

अंजनगाव सुर्जी ता.प्र.ता.(२)

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील जवर्डी शेत शिवारात आज मंगळवार दिनांक २ जुलै रोजी दुपारी १ वाजता बैलाला शॉक लागल्याने मृत्यु झाला असून शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.शेतकरी दिलीप विठ्ठलराव ढोक रा.जवर्डी ता.अंजनगाव सुर्जी यांचे जवर्डी शेत शिवारात असून शेतकरी हे त्यांच्या शेतात वखर मारीत असताना शेतातील विद्युत पोलला ताण दिलेल्या ताराला एका बैलाचा स्पर्श झाल्यामुळे त्या ताराचा बैलाला शॉक लागला त्यामुळे एका बैलाचा जागीच मृत्यू झाला.महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे बैलाचा मृत्यू झाला त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून महावितरण कंपनीने त्वरीत नुकसानीची भरपाई करून द्यावी तसेच प्रशासनाने तात्काळ मृत बैलाचा पंचनामा करून शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी शेतकरी दिलीप ढोक यांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close