जागतिक हिवताप दिनानिमित्त वडसा शाळेत जनजागृती कार्यक्रम

वडसा जुनी,/.प्रतिनिधी
जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळा, वडसा जुनी येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय, गडचिरोली अंतर्गत उपपथक वडसा (देसाईगंज) यांच्या वतीने पार पडला.
या कार्यक्रमाचे संचालन शाळेचे सहाय्यक शिक्षक तथा कब मास्टर श्री खेमराज तीघरे यांनी केले. प्रमुख उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक किशोरजी चव्हाण होते. आरोग्य विभागातर्फे श्री कुंभारे सर (आरोग्य पर्यवेक्षक), श्री कुलसंगे सर (आरोग्य सहाय्यक), श्री हजारे सर, श्री मेश्राम सर आणि श्री बडोले सर (आरोग्य सेवक) यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना हिवतापाबाबत सखोल मार्गदर्शन केले.
हिवताप होण्याची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. शाळेच्या वतीने स्मिता हजारे, मुजाहिद पठाण, राजेश मडावी, राहुल भैसारे व शिवराम हाके यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांच्या सहभागातून गावामध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली. विविध घोषवाक्यांद्वारे नागरिकांमध्ये हिवतापाविषयी जागृती निर्माण करण्यात आली.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक श्री प्रशांतजी पत्रे यांची लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना समाजात आरोग्याबाबत सजग भूमिका घेण्याचे महत्त्व पटवून दिले.