जण आक्रोश महामोर्चा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला
यवतमाळ वार्ता
अरविंद वानखडे
आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी व जागतिक निमित्त मणिपूर येथे झालेल्या, घटनेच्या जाहीर निषेध करण्याच्या दृष्टीने, यवतमाळ जिल्ह्यातील एक ना अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी नोंदविला असून, त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, भीम टायगर सेना, समता सैनिक दल, लहू टायगर सेना इत्यादीनी सहभाग नोंदविला असून यामध्ये प्रामुख्याने साक्षी नर्सिंग कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. सदर मोर्चा यवतमाळ येथील आझाद मैदानातून निघून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला हरार्पण करून महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री, माणिक रावजी ठाकरे तसेच माजी मंत्री शिवाजी राव मोघे, माजी मंत्री वसंतरावजी पुरके सर व जि. प. चे माजी अध्यक्ष प्रवीण भाऊ देशमुख आवर्जून उपस्थित होते.
मोर्चा यवतमाळ शहरातील मुख्य चौकातून पाच कंदील चौक ते आंबेडकर चौकातून हजारो च्या संख्येने यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला व अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवून उपस्थिताना मार्गदर्शन केले.