क्राइम

दारूची वाहतूक करणाऱ्या कडून लाच घेणे जमादाराला भोवले , रंगेहाथ अटक 

Spread the love
 
बीड / नवप्रहार वृत्तसेवा 
 
         देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या व्यक्ती कडून कारवाई न करण्यासाठी ५ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या जमादाराला एसीबी ने रंगेहाथ अटक केली आहे. ज्या ठाण्यात नोकरी केली त्याच ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची नामुष्की या लाचखोर कर्माचाऱ्यावर आली आहे. रावसाहेब गणपत मुंडे (वय ५१) असे पकडलेल्या लाचखोर पोलीस हवालदाराचं नाव आहे.
देशी दारूच्या बॉक्सची वाहतूक करू देण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी मासिक हप्ता म्हणून पाच हजार रूपयांची लाच घेताना पोलीस हवालदारास रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. ही कारवाई बीडच्या केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ करण्यात आली. रावसाहेब गणपत मुंडे (वय ५१) असे पकडलेल्या लाचखोर पोलीस हवालदाराचं नाव आहे. या करावाईमुळे खळबळ उडाली आहे
तक्रारदार हा देशी दारू बॉक्सची वाहतूक युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खेडेगावात करत होता. हीच वाहतूक करू देण्यासाठी आणि कारवाई न करण्यासाठी रावसाहेब मुंडे हे प्रत्येक महिन्याला तक्रारदाराकडून पाच हजार रूपयांची मागणी करत असत. अशीच मागणी केल्यानंतर तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगरच्या एसीबीकडे याबाबत तक्रार केली.
प्राप्त तक्रारीनुसार पथकाने खात्री केली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. दुपारच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच मुंडे यांनी लाच स्विकारली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. ज्या पोलीस ठाण्यात नोकरी केली, त्याच ठाण्यात रावसाहेब मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close