शाशकीय
जलयुक्त शिवार अभियान २.० साठी नागपूर जिल्हयातील २४३ गावांची निवड
नागपूर : राज्यातील टंचाई सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान २.० साठी नागपूर जिल्ह्यातील गावांची निवड केली आहे. या संदर्भातील गाव शिवार फेरीचे आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक उद्या बोलावली आहे.
पिकाच्या ऐन वाढीच्या काळात पावसाची अनियमत्ता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये ग्रामस्थ, शेतकरी व सर्व संबंधित विभागाच्या समन्वयाने शिवार फेरी काढून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ज्या ठिकाणी टंचाईची शक्यता अधिक आहे. अशाच गावांची यामध्ये निवड करण्यात आली आहे.यासाठी महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजना केंद्र नागपूर (एमआरएसएसी ) यंत्रणा, जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाने सूचवलेली गावे, कायम टंचाईग्रस्त गावे आणि अटल भूजल योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व आदर्श गाव व इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात आलेल्या गावांचा समावेश करण्यात आला आहे. अटल भूजल योजनेच्या सर्व निकष लागू असणारी गावे यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
या योजनेतील पुढील टप्पा म्हणजे गाव शिवार फेरी आयोजित करणे, यासंदर्भात उद्या सर्व यंत्रणांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होत असून त्यामध्ये गाव शिवार फेरी आयोजनाबाबतचा निर्णय होणार आहे.
या योजनेतून कृषी क्षेत्रात मृद व जलसंधारण क्षेत्रीय उपचार ओंगळ नियंत्रण उपचार जुन्या उपचारांचे बळकटीकरण आवश्यकतेनुसार दुरुस्ती गाळ काढणे, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, बंधारे पुनर्जीवित करणे, असे अनेक उपक्रम राबविले जातात. त्यातून शाश्वत संरक्षित सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यात येऊन कृषी उत्पादकतेमध्ये वाढ करण्यात येते. या योजनेची आता नागपूर जिल्ह्यात पुढील दोन महिन्यात अंमलबजावणी होणार आहे. आज जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात सर्व विभाग प्रमुखांची प्राथमिक बैठक झाली असून उद्या सर्व यंत्रणांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1