अजब गजब

जे 10 वर्षात डॉक्टरांना जमलं नाही तो आजार AI शोधला

Spread the love

 या नवीन प्रकरणामुळे डॉक्टरही आश्चर्यचकित 

             AI तंत्रज्ञाना बद्दल नेहमीप्रमाणे जनतेचे मतभेद आहेत. अश्यातच काही लोक AI चा वापर करू लागले आहेत. AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मदतीने लोक असंख्य प्रकारची कामं करू लागले आहेत. एका घटनेमुळे एआय आता डॉक्टरांचंही काम करणार की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

कारण एका युजरने दावा केला आहे की डॉक्टर दशकभरापासून ज्या आजाराचं निदान करू शकले नव्हते ते एआयने काही मिनिटात केलं आहे. असंख्य डॉक्टर, तज्ज्ञ व न्यूरोलॉजिस्टही या आजाराचं गूढ सोडवू शकले नव्हते. मात्र, एआयने चुटकीसरशी आजाराचं निदान केल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

‘१० वर्षांहून अधिक काळापासून न सुटलेली समस्या ChatGPT ने सोडवली’ या शीर्षकासह एका युजरने रेडिटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये युजरने म्हटलं आहे की “१० वर्षांहून अधिक काळ कित्येक वैद्यकीय चाचण्या, अनेक डॉक्टरांनी वेगवेगळ्या तपसण्यां केल्यानंतरही माझ्या आजाराचं निदान होत नव्हतं. मात्र चॅटजीपीटीने ते सहज केलं. माझ्या पाठीचा कणा दुखत असल्यामुळे मी एमआरआय, सीटी स्कॅनसारख्या तपासण्या केल्या. रक्ताच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या. देशातील सर्वोत्तम दर्जाच्या आरोग्यसेवा नेटवर्कमध्ये उपचार घेतले, न्यूरोलॉजिस्टसह अनेक तज्ज्ञांचा सल्ला घेतला. मात्र, कोणीही स्पष्ट निदान केलं नाही.”

या युजरने म्हटलं आहे की “मी फंक्शनल आरोग्य चाचण्या केल्या. त्यातून समोर आलं की माझ्या शरिरात A1298C MTHFR नावाचा अनुवांशिक जनुकीय बदल आहे. ७ ते १२ टक्के लोकांमध्ये हा दोष आढळतो.”

एआयमुळे तरुण बरा झाला

युजरने सांगितलं की “आजाराची सगळी लक्षणे, होणारा त्रास, प्रयोगशाळांमधील डेटा, आतापर्यंतच्या आरोग्य तपासण्यांचे अहवाल मी चॅटजीपीटीला दिले. त्यातून चॅटजीपीटीने निष्कर्ष काढला की हे सगळं जेनेटिक म्युटेशनशी जुळतंय. माझं बी-१२ नॉर्मल दिसत असलं तरी म्युटेशनमुळे शरीर ते योग्य प्रकारे वापरू शकत नाही. अशा वेळी सप्लिमेंट्सच्या माध्यमातून ते वाढवावं लागतं. चॅटजीपीटीवर मिळालेली माहिती घेऊन युजर डॉक्टरांकडे गेला. ते पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले. तसेच त्यांना प्रश्न पडला की आपण MTHFR चाचणी का केली नाही. त्यानंतर डॉक्टरांनी काही औषधं बदलली आणि माझ्या तब्येतीत सुधारणा झाली. हे सगळं पाहून मी एकाच वेळी आनंदी, आश्चर्यचकित आणि गोंधळलेलो आहे. मात्र आता तब्येतीत बरीच सुधारणा झाली आहे. त्रास कमी झाला आहे.”

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close