हटके

अजबच ह…….. सुनेने जीन्स टी शर्ट घालण्यास दिला नकार अन्….

Spread the love

उत्तरप्रदेश /नवप्रहार् मीडिया

             देशात फार विचित्र घटना गाहदात असतात. सुनेने अदबीने राहावे असे सासरच्या लोकांना नेहमी वाटते. तिने आपला पारंपरिक पोशाख घालावा मेकअप कमी करावे असे त्यांना वाटते. पण आम्ही आता आपणाला ज्या प्रकरणाबद्दल सांगणार आहोत ते ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. या कुटुंबात सासू सुनेचे ज्या कारणावरून भांडण झाले ते फारच वेगळे आहे. येथे सुनेने जीन्स आणि टॉप घालण्यास नकार दिला म्हणून पतीने तिला जबर मारहाण केली. प्रकरण आता पोलीस स्टेशन पर्यंत पोहचले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या एतमादपूर परिसरातील एका गावातील तरुणीचे काही महिन्यांपूर्वी शहरातील एका कुटुंबात लग्न झाले होते. तरुणीचा पती एका खासगी कंपनीत काम करतो. सासरे देखील आधुनिक विचारांचे आहेत. स्वतः पाश्चिमात्य संस्कृतीचे कपडे घालत असल्यामुळे सासरच्या मंडळींना सुनेने सुद्धा असंच राहिलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. वेस्टर्न कपडे घालण्यास सासरच्यांनी तरुणीला सांगितलं होतं. माझी सासू मला जीन्स आणि टी-शर्ट घालायला सांगते. पण माझा जीन्स आणि टी-शर्टवर आक्षेप आहे. मला साडी नेसायला आवडते. यावरुन सासरचे लोक मला टोमणे मारतात, असे मुलीने सांगितले. हद्द तेव्हा झाली जेव्हा यावरुन पतीने मला मारहाण केली. त्यामुळेच आपण पोलिसांत तक्रार केली असेही तरुणीने सांगितले. शेवटी पोलिसांनी हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवले.

तक्रारदार पत्नीला साडी नेसायला आवडत असल्याचे तिने सांगितले. सासरच्या घरी ती साडी नेसते होती. जेव्हा तिच्या सासूने जीन्स आणि टी-शर्टसाठी आग्रह करण्यास सुरुवात केली तेव्हा तिने स्पष्टपणे नकार दिला. पतीने तिच्यासाठी बाजारातून जीन्स आणि टी-शर्ट देखील आणले. मात्र तिने जीन्स घालण्यास नकार दिला. यावर तिच्या पतीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. याबाबत मुलीने तिच्या आई वडिलांना याची माहिती दिल्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

दरम्यान, पोलिसांनी हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवले. समुपदेशकाने दोन्ही बाजूच्या लोकांना कार्यालयात बोलावले होते. अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंच्या लोकांच्या समुपदेशन केले. मात्र तरीही दोन्ही बाजूंमधील वाद मिटू शकला नाही. दोन्ही पक्षांना आता पुढील तारीख देण्यात आली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close