Uncategorized
त्या फ्लॅट मध्ये सुरू होता भलताच प्रकार पोलिस आले अन्…..
चेन्नई / नवप्रहार मीडिया
चेन्नई येथील ईस्ट कोस्ट या पॉश इलाक्यातील सदनिकेतील फ्लॅट मध्ये वाइफ स्वॅपिंग’ च्या नावावर भलताच प्रकार सुरू असल्याचा पोलिसांना निनावी फोन आला.पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून तपासला सुरवात करताच पोलिसांना जे आढळले ते पाहून पोलीस देखील काही काळासाठी गोंधळले.
पोलिसांना ईस्ट कोस्ट भागातून ऐक निनावी फोन आला.फोन कर्त्याने सांगितले की त्यांच्या सदनिकेत ऐका फ्लॅट मध्ये महिला आणीं पुरूषांची गर्दी असते. याठिकाणी काहीतरी चुकीचे काम सुरू असल्याचा त्याला संशय आहे.एरव्ही कानाडोळा करणाऱ्या पोलिसांनी या कॉल ची लगेच दखल घेत घटनास्थळ गाठले.पोलिसांच्या तपासात आढळून आले की या ठिकाणी महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे.आणि हा सगळा प्रकार वाईफ स्वॅपिंग क्या नावाखाली सुरू आहे.
आठ लोकांना अटक – आठ लोकांना अटक करण्यात आली आहे ते आठ लोक चेन्नईतल्या बऱ्याच भागांमध्ये वाईफ स्वॅपिंग पार्टीजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत असतं. कोईंबतूर, मदुराई, सालेम या भागांमध्ये ‘वाईफ स्वॅपिंग’च्या पार्त्यांच्या नावाखाली वेश्याव्यसाय सुरु होता. पोलिसांनी आता या आठ जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु हिमा करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सेंथिल कुमार, चंद्रमोहन, कुमार, शंकर, वेलराज, पेरासन, सेल्वन आणि व्यंकटेशकुमार या आठ जणांना अटक केली आहे. हे आरोपी अविवाहित तरुणांना हेरत असत आणि त्यांची काही महिलांशी ओळख करून दिली जायची.
यासाठी घेतल्या जात होती सोशल मीडिया पेज ची मदत – पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींनी ‘वाईफ स्वॅपिंग’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवण्यासाठी एक सोशल मीडिया पेजही तयार केलं होतं. त्या माध्यमातून हे वेश्याव्यवसायाचं रॅकेट चालवत होते अशीही माहिती पोलिसांनी दिली. पुरुषांकडून १३ ते २५ हजार रुपयांची मागणी केली जात असे. त्यानंतर पुरुषांना महिलांची ओळख करुन दिली जात असे. एका महिलेच्या जाळ्या पुरुष अडकला की त्याला इतर महिलांचं आमिषही दाखवलं जात असे. वाईफ स्वॅपिंग पार्टीज’च्या नावे वेश्याव्यवसाय चालवण्यात हे सगळे गुंतलेले होते.