आय.टी.आयचे वेळापञक जाहीर
अमरावती — के.कुलट — ग्रामीण भागातील विद्यार्थी १० वी १२ वी निकालानंतर औद्योगीक क्षेञात आपले करीअर करण्याच्या दृष्टीने जास्त कल देतात. त्यांना आपल्या आर्थिक परीस्थितीनुसार घरचा डोलारा सांभाळण्याच्या दृष्टीने राहतात. त्यांना लवकर रोजगार मिळावा हा हेतु असतो.त्यामुळे आय.टी.आय करुन एखाद्या कंपनीत नौकरी करणे हा त्यांचा दृष्टीकोन असतो.त्याच औद्योगिक प्रशिक्षन संस्था (आय.टी.आय) चे वेळापञक जाहीर झाले आहे. शासकीय,खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश प्रकीया सुरु झाली आहे. विद्यार्थ्याना ११ जुलै २०२३ पर्यत अर्ज भरुन कागदपञे पडताळणी करता येणार आहे.त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी १३ जुलैला तर अंतिम यादी १६ जुलै रोजी प्रसिध्द होणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द झाल्यानंतर संस्था आणि अभ्यासक्रम निवडीच्या फेर्या होतील. २० जुलैला पहीली निवड यादी लागेल.जिल्हात शासकीय आय.टी.आय मध्ये एकुण १ हजार ३२८ जागा आहेत.आँनलाईन केद्रीय पध्दतीने ही प्रवेश प्रकीया होणार आहे. ज्या विद्यार्थाना अर्ज करायचे असतील त्यांनी अधिकृत संकेतस्थळावरुन अर्ज सादर करावा.