राजकिय

मुख्यमंत्र्यांच्या शिलेदाराने धरली तुतारी 

Spread the love

ठाणे / नवप्रहार डेस्क 

                  निवडणुकीचा बिगुल वाजल्या नंतर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजपा ने तर आपली पहिली यादी जाहीर सुद्धा केली आहे. आणि भाजप च्या पहिल्या यादी नंतर शिंदे च्या शिलेदाराने त्यांची साथ सोडून तुतारी हातात धरली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख सुभाष पवार यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सुभाष पवार यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. सुभाष पवार हे महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांना आव्हान देण्याची शक्यता आहे.

 

 

ठाण्यातील शिंदे गटाचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तुतारी फुंकली आहे. या आधी ते मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक होते. त्यांनी मुरबाड मतदारसंघातून इच्छुक आणि भाजपचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्या विरोधात तिकीटाची मागणी पक्षाकडे केली होती. त्यानंतर आज सोमवारी सुभाष पवार यांनी शरद पवार गटात प्रवेश केला.

दरम्यान, शिंदे गटाचे नेते सुभाष पवार यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याआधीच बदलापूर शहरप्रमुख शैलेश वडनेरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी बंडाचा झेंडा फडकवण्याचा इशारा दिला होता. लोकसभेत विरोधात काम केलं, त्यांना पक्षात घेऊ नका, अशी मागणी शरद पवार गटाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी केला आहे.

शैलेश वडनेरे काय म्हणाले?

‘शरद पवार गटाचे कार्यकर्ते मागील अडीच वर्षांपासून झटत आहेत. लोकसभेत जिवाचं रान करून कार्यकर्त्यांनी बाळ्या मामा म्हात्रे यांनी खासादर म्हणून निवडून आणलं. त्यावेळेस ज्यांनी विरोधात काम केलं. त्यांनाच पक्षात प्रवेश दिला जात असेल तर आम्ही अपक्ष निवडणूक लढवू, असा निर्धार शैलेश वडनेरे यांनी व्यक्त केला होता. वडनेरे यांच्या भूमिकेने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, वडनरे यांच्या विरोधानंतरही शरद पवार गट काय भूमिका घेतो, हे पाहावे लागेल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close