सामाजिक

वृक्षतोडी विरोधात, वृक्षलागवडीसाठी लोकांपर्यंत प्रबोधन होणे आवश्यक …प्रकाश निखारे

Spread the love

 

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : २१ मार्च ‘जागतिक वन दिवस’ पर्यावरणाचे महत्त्व सर्व सामान्यांपर्यंत पोहचावे,पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडाचे काय महत्व आहे याची माहिती मिळावी असा उद्देश समोर ठेऊन हा दिवस कन्नमवार विद्यालयात विद्यार्थ्यांनी वृक्षाला वोढनि घालून आपली कृत्यज्ञता दाखविली. पृथ्वीतलावरील जंगल झपाट्याने कमी कमी होत आहे.त्याच्या दृश्य परिणाम तर आपल्या समोर आहेच,वाढलेले तापमान,बदललेले ऋतुचक्र,वारंवार होणारे भूकंप,त्सुनामी हे सगळे “निसर्गाच्या कोप” अशी अनेक संकटे आपल्या समोर उभी आहेत.हे सगळे आपण बदलू शकतो कारण अजूनही वेळ गेली नाही आजही पृथ्वीवर ३०% पेक्षा जास्त जंगले तग धरून आहेत, संपूर्ण मानव जातीला प्राण वायू पुरवण्याचे काम प्राणपणाने करत आहेत.
पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने वनांचे महत्व अनन्यसाधारण आहे,गेल्या काही वर्षातील अपरिमीत वृक्षतोडीमुळे हे संतुलन बिघडू लागले आहेत,त्यामुळे वातावरणात तापमानात वाढ, वातारणातील बदल,पुर,दुष्काळसदृश परिस्थिती,गारांचा पाऊस अशा अनेपक्षित रित्या येणाऱ्या समस्यांना आपणाला समोर जावे लागत आहे, वनक्षेत्राची हानी ही मोठ्या प्रमाणावर वणवा लागल्याने होत असते. वनांचे आग लागून तेथील जैव विविधता संकटात येते. पर्यावरणीय समतोलासाठी वनांचे जतन आणि संवर्धन मोठ्या प्रमाणावर करणे ही आज काळाची गरज बनली आहे. यावर उपाय म्हणून संपूर्ण वन विभागाने वन संधारन,संवर्धन आणि विकासासाठी काळाची गती ओळखून वृक्षतोडी विरोधात आणि वृक्षलागवडीसाठी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होणेही आवशक आहे. असे या कार्यक्रमाचा वेळी कन्नमवार विद्यालयातील कलाशिक्षक प्रकाश निखारे यांनी व्यक्त केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close