निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असणे गरजेचे आहे – प्राचार्य डॉ.जी एन. चौधरी
मोर्शी / ओंकार काळे
श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित श्री आर.आर.लाहोटी विज्ञान महाविद्यालय मोर्शी येथे नुकताच प्राणीशास्त्र विभागातर्फे झूलॉजिकल सोसायटीचे उद्घाटन तसेच एम.एस.सी. भाग-1 प्राणिशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.एन. चौधरी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे आय.क्यू. ए.सी. विभागाचे कॉर्डिनेटर प्रा.डॉ.ए.व्ही. कोहळे उपस्थित होते. प्राचार्य डॉ.जी.एन.चौधरी यांनी झूलॉजिकल सोसायटीचे कर्तव्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तसेच प्रत्येकाने निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.तसेच प्राणिशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.अश्विन लुंगे यांनी झूलॉजिकल सोसायटी स्थापन करण्याचे ध्येय व उद्दिष्ट विद्यार्थ्यांसमोर मांडले.
प्रा.डॉ.ए.व्ही.कोहळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व झूलॉजिकल असोसिएशनच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांनी करावे असे सुचविले. झूलॉजिकल सोसायटी चे अध्यक्ष नयन रामटेके यांनी वर्षभर घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षाली पोहरकर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.अश्विन लुंगे यांनी व आभार प्रदर्शन प्रा.डॉ. शितल पारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता झूलॉजिकल सोसायटीचे सर्व कार्यकारिणी, प्राणीशास्त्र विभागातील प्रा. डॉ.के.इ.लांडगे, प्रा.अंकित औतकर, प्रा. कोमल गतफने, श्रेयश राऊत व प्राणीशास्त्र विभागाचे सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.