हटके

लग्नाच्या व्हिडिओत असं काय आहे की त्याला मिळाले आहेत कोट्यवधी व्हीव्ज 

Spread the love

मुंबई / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                   कुटुंबात लग्न म्हटलं की एक वेगळाच आनंद आणि ऊर्जा पाहायला मिळते.  या क्षणाची जितकी आतुरता नवरा मुलगा आणि नवरी मुलगी ला असते त्याहीपेक्षा जास्त आतुरता त्यांच्या मित्र मंडळींना असते. कारण त्यांना मित्र किंवा मैत्रिणीच्या लग्नात मजा करायला भेटणार असते. हा झाला एक भाग दुसरे असे की वर्तमान काळात अँड्रॉइड मोबाईल आल्यापासून अनेक लोक लग्न समारंभातील काही मजेशीर क्षण मोबाईल मध्ये टिपून ते व्हायरल करण्याच्या तयारीत असतात. आता त्याची खुप मज्जा घेता येईल, हा विचार करून आणि त्यांच्या डोक्यातील याच खुरापाती आयडीयाजमुळे निर्मीती होते भन्नाट व्हिडीओज आणि रिल्सची. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, ज्यावर कॅप्शन देण्यात आलंय ‘ये कुछ नया था’ आणि खरंच यातील आयडीया नवीन आहे. विशेष म्हणजे या काही सेकंदाच्या व्हिडीओला दीड मिलीयन पेक्षा जास्त लाईक्स मिळालेत.  सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.ज्याला लक्षावधी व्हीव्ज तर मिळाले आहेत. सोबत त्यावर कॉमेंट्स चा अक्षरशः वर्षाव होत आहे. चला तर जाणून घेऊ या काय आहे या व्हिडिओत.

              हा व्हिडीओ मुलीच्या पाठवणीचा (बिदाई ) चा आहे.मुलीची पाठवणं हा प्रत्येक मुलीच्या कुटुंबियांसाठी भावुक क्षण असतो. कारण त्यानंतर मुलगी ही कुटुंबापासून दुरावणार असते. त्यामुळे मुलीकडील मंडळी ही भावनिक असते आणि मुलीकडील नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रू असतात. पण या लग्नात मुलाच्या मित्रांनी जो व्हिडीओ बनवला आहे त्यात नवरी मुलगी नवऱ्या मुलाला खेचत घेऊन जात असताना दिसत आहे.

लग्नाच्या खुप साऱ्या विधी असतात. प्रत्येक विधीमध्ये थट्टा करण्याची संधी मिळत असते. कधी वधू पक्षाला वर पक्षाची खेचायची संधी मिळते तर कधी वर पक्षाला वधू पक्षाची थट्टा करण्याला स्पेस मिळते. पण एक अशी विधी असते जिथे सगळेच जण अगदी शांत आणि भावूक होतात. ती वेळ असते – वधूच्या पाठवणीची. सगळं सुफळ मंगळ पार पडल्यानंतर आपल्या मुलीला कायमचं दुसऱ्या घरी जावं लागणार हा विचारचं आई-वडीलांचं हृदय पिळवटून टाकतो.

मुलीच्या भावनांचा तर आपण वेधही घेऊ शकत नाही. लहानपणापासून ज्यांच्यासोबत राहिलो त्या सगळ्यांना सोडून जाणं, क्षणात परकं होणं या भावना अगदीच त्रास देतात. अशा या नाजूक भावनांची थट्टा करण्याचं कुणी घाडसंही करत नाही. पण या व्हिडीओमध्ये नेमकं तेच झालंय. पाठवणीच्या विधीची इथे थट्टा करण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे सगळ्या मुलींना हे पटताना दिसतंय. कमेंट्समध्ये मुली म्हणतात, ‘खरंच असं व्हावं’ 

 

तर या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहे पाठवणी पण मुलीची नाही तर मुलाची! लग्न झाल्यानंतर मुलगा त्याच्या मित्रांच्या गळ्यात पडून फुंदूफुंदू रडताना दिसतोय.

त्याचे मित्रही तसेच ढसाढसा रडतायत. त्याचा हात न सोडण्याचा प्रयत्न करतायत. कारण दुसऱ्या बाजूला चक्क वधू नवरदेवाचा हात धरून त्याला ओढत आपल्या घरी नेताना दिसतेय आणि या सगळ्या मजेशीर प्रसंगाला बॅकग्राऊंड गाणं वाजतंय – ‘सजन घर मै चली…’ हे गाणं तर या आनोख्या विदाईला अजूनच अफलातून करतंय. अगदी या गंमतीला मसाला देण्याचं काम यातून घडताना दिसतंय. या हटके आयडीयामुळेच हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडताना दिसतोय. सोशल मीडियावर या व्हिडीओला आतापर्यंत 1 मिलीयनहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. विशेषतः हा व्हिडीओ पाहून मुली खूप आनंदी होताना दिसत आहेत आणि मजेदार प्रतिक्रियाही देत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close