ब्रेकिंग न्यूज

‘ हाथ है या हतौडा  ‘ बायकोने ऐका बुक्कित फोडला नवऱ्याचा डोळा

Spread the love
सोनभद्र / नवप्रहार मीडिया 
                  सोनभद्र जिल्ह्यात घडलेल्या ऐका घटनेने  नवऱ्यावर  ‘ यह हाथ है या हतौडा ‘ असे बोलण्याची वेळ आली आहे. नवऱ्याने बायकोला माहेरी जाण्यास मनाई केली म्हणून बायकोने रागाच्या भरात नवऱ्याला असा ठोसा लगावला की तो त्याच्या डोळ्यावर लागला. आणि त्याच्या डोळ्याचे बुबुळ बाहेर आले. यामुळे नवऱ्याची दृष्टी गेली आहे. यामुळे परिसरात खळबळ असून  सगळ्याच्या तोंडून मिश्किल पणे  ‘ यह हाथ है या हतौडा ‘ असे शब्द निघत आहे.  विशेष म्हणजे पुण्यात देखील नवऱ्याने वाढदिवसाला दुबई न नेल्याने पत्नीने रागाच्या भरात त्याला ठोसा लगावला होता. तो त्याच्या नाकावर लागल्याने त्याचा जीव गेला होता.

  . या प्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. या घटनेची सोनभद्र जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशातल्या सोनभद्र जिल्ह्यातल्या रामगड गावात एक धक्कादायक घटना घडली. पत्नीने भांडणादरम्यान रागाच्या भरात पतीचा डोळा फोडला असून, यामुळे पतीचा एक डोळा निकामी झाला असून, त्याची दृष्टी गेली आहे. रामगडमध्ये गुलाम रब्बानी आणि अलकमा हे दाम्पत्य राहतं. तीन वर्षांपूर्वी या दोघांचा विवाह झाला होता. या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला आणि रागाच्या भरात अलकमाने रब्बानीचा उजवा डोळा फोडला. यामुळे गुलामचा एक डोळा निकामी झाला आहे.

दरम्यान, ही घटना घडल्यावर गुलामला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे; मात्र त्याने एक डोळा कायमचा गमावला आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. डोळ्याची जखम खोल असल्याने दृष्टी येणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी अलकमाला अटक केली आहे. एका छोट्या कारणासाठी अलकमा इतकं गंभीर कृत्य करील, असं कुटुंबीयांना वाटल नव्हत.
विवाहानंतर गुलाम आणि अलकमा यांचा संसार ठीकपणे सुरू होता. काही दिवसांपासून अलकमा माहेरी जाण्यासाठी गुलामकडे हट्ट करत होती; पण गुलामचा याला विरोध होता. त्याचा विरोध असतानादेखील अलकमाचा हट्ट कायम होता. शुक्रवारी (24 नोव्हेंबर) अलकमाने पुन्हा माहेरी जाण्याचा हट्ट सुरू केला. यावरून गुलाम आणि अलकमा यांच्यात भांडण सुरू झालं. रागाच्या भरात अलकमा काठीनं गुलामला मारहाण करू लागली. मारहाण करूनही तिचं समाधान झालं नाही. अखेरीस तिनं बोटांनी गुलामचा उजवा डोळा फोडला आणि बुब्बुळ बाहेर काढलं. या घटनेत गुलामने त्याचा एक डोळा कायमचा गमवला आहे. गुलामच्या एका डोळ्याची दृष्टी गेलेली असून, या कृत्यासाठी पोलिसांनी अलकमाला अटक केली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close