जागतिक

इराणच्या दाव्याने जगात खळबळ, ट्रम्प यांची झोप उडवणारा दावा 

Spread the love
 
           इस्त्रायल आणि अमेरिकेने इराण वर हल्ला केला आहे. या दोन देशांकडून होणाऱ्या हल्ल्याला इराण सुद्धा चोख प्रत्युत्तर देत आहे.  अशातच आता इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारिजानी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारा दावा केला आहे. अलीकडील संघर्षादरम्यान अनेक अमेरिकन सैनिकांना इराणी सैन्याने कैद केले आहे आणि अमेरिका ही बाब लपवण्याचा प्रयत्न करत आहे असा दावा लारिजानी यांनी केला आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अनेक अमेरिकन सैनिकांना अटक

फेब्रुवारीच्या अखेरपासून अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ले सुरू केले आहेत. याला प्रत्युत्तर देताना इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने अनेक संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य करत शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे प्रतिहल्ले केले आहेत. या कारवाईत काही अमेरिक सैनिकांना अटक करण्यात आल्याचेही समोर आले आहे. एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये लारिजानी यांनी म्हटले की, ‘अनेक अमेरिकन सैनिकांना अटक करण्यात आली आहे. मात्र अमेरिका हे सैनिक युद्धात मारले गेल्याचे सांगत आहे, पण ही सत्यता जास्त काळ लपवता येणार नाही.’

इराण अमेरिकेला उत्तर देणार

अली लारिजानी यांनी एक दिवस आधी अमेरिकेला इशारा दिला होता की, प्रत्येक कारवाईला प्रत्युत्तर दिले जाईल. अमेरिकेने हे समजून घ्यावे की इराणच्या संयमाची परीक्षा घेणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणे याचे गंभीर परिणाम होतील. राष्ट्रीय निर्धाराच्या बळावर इराण अमेरिकन आक्रमकतेला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि अमेरिकेला त्यासाठी जबाबदार धरले जाईल.

अनेरिकेचे उद्दिष्ट साध्य झाले नाही

लारिजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, ट्रम्प यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, इराणविरोधातील अमेरिकेची व्यापक रणनीती अपयशी ठरली आहे. अमेरिकेचे मुख्य उद्दिष्ट इराणची शासनव्यवस्था कमकुवत करणे आणि राष्ट्रीय एकता खंडित करणे होते, परंतु हे उद्दिष्ट साध्य झालेले नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close