जागतिक

इराण कडून या मित्र देशाची युद्धात उडी ; इस्त्रायल वर केले हल्ले 

Spread the love

              मध्य पूर्वेत सुरू असलेल्या इराण – अमेरिका – इस्त्रायल युद्धाची व्याप्ती दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे जागतिक तणाव वाढला आहे.  या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद केला आहे. स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद झाल्यामुळे जगातील अनेक देशांवर इंधन टंचाईचं मोठं संकट कोसळलं आहे.

इराणने जरी आपल्या काही मित्र देशांसाठी स्ट्रीट ऑफ होर्मूज खुला केला असला तरी या मार्गाने आता पूर्वी इतकी तेलाची वाहतूक करणं शक्य होत नाहीये. तर दुसरीकडे आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे, गेल्या काही दिवसांपासून अमेरिका इराणसोबत युद्धविरामचा प्रयत्न करत आहे, मात्र यामध्ये अजूनही यश आलेलं नाही त्यातच आता या युद्धामध्ये हुती बंडखोरांची एन्ट्री झाली आहे.

यमनची राजधानी असलेल्या सनावरून हुती बंडखोरांनी इस्त्रायलवर भीषण मिसाईल हल्ला केला आहे. यामुळे आता फक्त इस्त्रायल आणि अमेरिकेचंच टेन्शन वाढलं नाहीये तर संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे. आधीच या युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद आले, त्यानंतर आता आणखी दोन समुद्री मार्ग बाब-अल-मंडेब सामुद्रधुनी आणि सुएझचा कालवा देखील हुती बंडखोरांकडून बंद केला जाण्याची शक्यता आहे. जर हे दोन रस्ते एकाचवेळी बंद झाले तर संपूर्ण जगाला याचा मोठा फटका बसणार आहे, कारण फक्त तेलाचीच वाहतूक नाही तर संपूर्ण वाहतूकच बंद होऊन, निर्यात -आयात ठप्प होऊ शकते. याचा सर्वात मोठा फटका हा युरोपीयन राष्ट्रांना बसू शकतो.

मध्य पूर्वेत तीन प्रमुख व्यापारी मार्ग आहेत, त्यातील महिला मार्ग म्हणजे होर्मूज, दुसरा बाब अल मंडेब आणि तिसरा सुएझचा कालवा. हे तीन मार्ग बंद झाले तर याचा जगातील सर्वच देशांना मोठा फटका बसू शकतो. भारताच्या देखील अडचणी यामुळे वाढणार आहेत. काही दिवसांपूर्वी हुती बंडखोरांकडून या युद्धात उतरण्याचे संकेत देण्यात आले होते. अखरे हुती बंडखोरांची या युद्धात एन्ट्री झाली आहे. हुती बंडखोरांनी यमच्या राजधानीमधून इस्त्रायलवर भीषण मिसाईल हल्ला केला आहे. या युद्धात आता हुती बंडखोरांची एन्ट्री झाल्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close