IPS अधिकाऱ्यावर पॉक्सो आणि भारतीय दंड संहिते प्रमाणे चौकशी करण्याचे आदेश

आसाम / नवप्रहार ब्युरो
आसाम कॅडर चे आयपीएस अधिकारी गौरव उपाध्याय यांच्यावर पॉक्सो आणि IPS च्या विविध कलमा अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिलें आहेत. यावरून त्यांच्यावर आता कायद्या अंतर्गत फौजदारी प्रकरण चालेल हे निश्चित झाले आहे.
काय आहे प्रकरण ? – सन 2019 मध्ये गौरव उपाध्याय कार्बी आंगलोंग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक असताना त्यांच्यावर आरोप लावण्यात आले होते की त्यांनी एका 14 वर्षाच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन घेतले होते आणि तिच्या प्रायव्हेट पार्टला हात लावला होता. हां प्रकार दोन वेळा झाल्याचा आरोप आहे. एक वेळा दिफू येथील एसपी बंगल्यात आणि दुसऱ्या वेळा त्या हॉटेल च्या खोलीत जेथे पीडित आपल्या आई आणि भावासह थांबली होती.
काय आहे आरोप पत्रात – आरोप पत्रात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की पीडित आपल्या आई आणि भावासह गौरव उपाध्याय यांच्या मुलाच्या वाढदिवसात गेले होते. उपाध्याय हे त्यांना आपले कार्यालय दाखवायला घेऊन गेले होते. जेव्हा पीडितेची आई वॉश रूम गेलीं होती तेव्हा उपाध्याय यांनी मुलीचे तिच्या भावासमोरच दोन वेळा चुंबन घेतले.
यानंतर उपाध्याय त्यांना हॉटेल मध्ये सोडायला गेले होते. त्यांनी पहिलेच त्या हॉटेल मध्ये सूट बुक केले होते. त्यावेळींl त्यांनी मोबाईल वर व्हिडिओ दाखविण्याच्या बहाण्याने पीडितेच्या प्रायव्हेट पार्टला हात लावला होता. आणि तिला किस करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पीडितेने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली होती.
पीडितेच्या आईने दुसऱ्या दिवशी केली तक्रार – पीडितेच्या आईला जेव्हा याबद्दल कळले तर तिने दुसऱ्या दिवशी झाजे 3 जानेवारी 2020 रोजी गुवाहाटी येथील महिला पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती. नंतर प्रकरण CID kade सोपविण्यात आले होते. चौकशीत सीआयडीला उपाध्याय दोषी आढळले.
कोर्टाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश – न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की कुठल्याही मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध किस करणे आणि तिच्या खाजगी अवयवाला हात लावणे हा गुन्हा आहे. कोर्टाने मानसोपचार तज्ञांचा हवाला देत म्हटले आहे की यामुळे पीडिता डिप्रेशन मध्ये गेली होती.
गौरव उपाध्याय हे 2012 तुकडी चे IPS अधिकारी आहेत. सध्या ते आसाम मध्ये राज्य परिवहन विभागात अतिरिक्त सचिव पदावर कार्यरत आहेत. त्यांच्यावर आता न्यायालयात प्रकरण चालणार आहे.