मातोश्री कृष्णाबाई देशमुख विद्यालय अमरावती येथे ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान अंतर्गत तपासणी
स्पर्धात्मक वातावरणातून शिक्षणासाठीचा उपक्रमाचे समिती सदस्या कडून कौतुक
अमरावती
स्था. प्रः राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधून स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, आनंददायी व प्रेरणादायी वातावरण निर्माण व्हावे, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’, हे अभियान १ ते ३१ जानेवारी दरम्यान माजी मुख्याध्यापक भय्या मोहोड व १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान मुख्याध्यापक विनोद तिरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री कृष्णाबाई देशमुख विद्यालय,प्रभू काॅलनी अमरावती येथे राबविण्यात आले होते. या उपक्रमाचे युडायस प्लसवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन त्यामधे या उपक्रमासंदर्भात घेण्यात आलेले उपक्रमाचे फोटो व माहिती अपलोड करण्यात आली होती.त्यानुसारच याबबतची शाळा स्तरावरील तपासणी दि.13 फेब्रुवारी 2024 रोज मंगळवारला मातोश्री कृष्णाबाई देशमुख विद्यालय, प्रभू काॅलनी अमरावती येथे महानगर पालिका शिक्षण विभाग अंतर्गत नेमणूक करण्यात आलेल्या केंद्रप्रमुख रवि हरणे,कु.जया चौधरी (कडू) व कु.मिदिनी देवळे यांच्या पथकाकडून करण्यात आली.अशी माहिती रविंद्र सोळंके यांनी दिली.
या पारितोषक स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट, पर्यावरण, वृक्षारोपणाचे जोपासन, शाळांच्या इमारतीची, संरक्षक भिंतीची रंगरंगोटी, प्रबोधनात्मक सुविचार, चित्रे इत्यादी बोलक्या भिंती बाल मंत्रिमंडळ बालसभा स्थापन करून शाळेचे कामकाज प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने नियोजन करणे, प्रधानमंत्री पोषण निर्माण योजनेअंतर्गत आवारातील परसबागेची निर्मिती करणे, मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सहभाग, नवसाक्षरता अभियानातील शाळेचा सहभाग, विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीचे प्रमाण, महावाचन चळवळीतील विद्यार्थ्यांचा सहभाग, वक्तृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा, संगीत स्पर्धा, इतर कला स्पर्धा यांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग, स्वच्छता मॅनिटर, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरिता आरोग्य तपासणी शिबिर, शाळेत प्रथमोपचार पेटीची उपलब्धता, बदलत्या जीवनशैलीतून लहान वयात होऊ घातलेल्या लठ्ठपणा मधुमेह डोळ्याचे विकार यासारख्या आजारांची माहिती व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन, किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी मासिक पाळी व्यवस्थापन समुपदेशन सत्राचे आयोजन, हात स्वच्छ धुण्याचे योग्य पद्धतीने प्रात्यक्षिक, विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापर्यंत आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने पैशाचे नियोजन, गुंतवणूक बँक, भौतिक सुविधा अध्यापन, तंबाखू मुक्त शाळा, शाळेपासून २०० मीटर अंतरावर तंबाखू मुक्त पदार्थांच्या विक्रीस बंदी, प्लास्टिक मुक्त शाळा, प्रधानमंत्री पोषण निर्माण योजनेअंतर्गत अशा विविध विषयावर तपासणी पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली व स्पर्धात्मक वातावरणातून शिक्षणासाठीचा उपक्रमाचे समिती सदस्य केंद्रप्रमुख रवि हरणे, जया चौधरी व मिदीनी देवळे यांचेकडून कौतुक करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक, पर्यावेक्षक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते अशी माहिती रविंद्र सोळंके यांनी दिली.
रविंद्र सोळंके म्हणाले, ‘‘राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना राबविण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’, हे अभियान आहे. या अभियानाचा अधिक प्रभावी विस्तार होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सामाजिक सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मता असे चांगले चांगले उपक्रम यामधे घेतल्या गेले