महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिन आणि डॉ. रंगनाथन जयंती
सचिन महाजन /हिंगणघाट ग्रामीण प्रतिनिधी
श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालय वडणेर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रेड रिबन क्लब व ग्रामीण रुग्णालय वडणेर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिन आणि डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. सारिका चौधरी, मार्गदर्शक वैशाली माळोदे, वर्षा दांडेकर, एड्स समुपदेशक ग्रामिण रुग्णालय वडणेर तसेच कल्पना मंगेकर लिंक वर्कर वडणेर, इत्यादींची उपस्थिती होती. सुरवातीला ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्य ग्रंथ प्रदर्शनी आणि मार्गदर्शन डॉ. सारिका चौधरी यांनी केले. महा – युवा संवाद कार्यक्रमाचा शुभारंभ मा आरोग्यमंत्री यांचे हस्ते पुणे येथे होत असतांना रेड रिबन क्लब समितीचे सर्व सभासद आणि विद्यार्थी महाविद्यालयामध्ये उपस्थित राहून ऑनलाईन पद्धतीने लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.
एड्स आणि युवा याविषयावर मार्गदर्शन करताना एड्स संपूपदेशक वर्षा दांडेकर यांनी एड्स होण्याची काही कारणे सांगितली ते म्हणजे एच. आय . व्ही./ एड्स रुग्णांचे रक्त ~दुसऱ्या रुग्णाला देणे, दूषित रक्त असलेल्या सुई इंजेक्शन मधून होतो, असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्याने होते अशा अनेक कारणांनी एच. आय . व्ही / एड्सची लागण होत असल्याचे सांगितले या कारनाविषयी युवकांनी स्वत: दक्षता घेणे आज काळाची गरज आहे आणि ही आपली जबाबदरीदेखील आहे. तर युवक युवतींनी विवाह होण्या अगोदर आपल्या जोडीदारा सोबत एकनिष्ट राहून एच. आय. व्ही./एड्स ची चाचणी करून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट मत डॉ. सारिका चौधरी यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. गणेश एन. बहादे यांनी केले. संचालन चेतन साटोने, यांनी केले तर आभार अभय पोहणे यांनी मानले. उपस्थित डॉ. प्रवीण कारंजकर, डॉ. विनोद मुडे, डॉ. नरेश भोयर, डॉ. पंकज मून, प्रा. आरती देशमुख, डॉ. नीतेश तेलहांडे, डॉ. संजय दिवेकर, नरेश कातडे, शंकर कापसे, संजय पर्बत, प्रीती संयंकार, सुरेश तेलतूमडे, अरुण तिमांडे, अंकुश वैद्य, विजयालक्ष्मी जारोंडे,सचिन कोळसे प्रफुल शिंदे, रुचिता वेले, दर्शना शिवरकर, नंदिनी ठाकरे, तनु गवळी, राधिका गोटेफोडे, प्रियंका बोंडे, नेहा येळके, पल्लवी पिंपलशेंडे, पायल येरचे , कीर्ती वाढई , अंजली तळवकर, संजवणी आपे, कामेश कुमरे, सूरज मडावी , आकाश शिंदे, मयुरी डोळसकर, मोनाली लडके, दिव्याभारती अवचट, हर्शदा महाजन, समीर पवार, स्नेहल कामतकर इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.