स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा
“वसुधैव कुटुंबकम” या संकल्पनेखाली आयोजन
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था संचालित स्कुल ऑफ स्कॉलर्स येथे “वसुधैव कुटुंबकम” या संकल्पनेखाली “आंतरराष्ट्रीय योग दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्कूल ऑफ स्कॉलर्स धामणगाव रेल्वेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, प्रमुख पाहुणे व योग प्रशिक्षक रीना अजयसिंह ठाकूर उपस्थित होत्या. रीना ठाकूर ओरिया या एरोबिक्स स्टुडिओ धामणगाव रेल्वेच्या ओनर आणि प्रशिक्षक देखील आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या के. साई नीरजा होत्या. त्यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संगीत शिक्षक गौरव देवघरे यांनी सुंदर योग गीत सादर केले. योग दिनाचे महत्त्व समजावून सांगून प्रत्येकाने योगा करणे का महत्त्वाचे आहे याची माहिती देत योग प्रशिक्षकांनी प्रत्येकाला विविध प्रकारची आसने सांगितली व सर्वांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्या के. साई नीरजा व पर्यवेक्षिका शबाना खान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे प्रमुख इंग्रजी शिक्षक प्रदीप मांडवकर, इंग्रजी शिक्षक नितीन श्रीवास, इंग्रजी शिक्षक मयुरी लांजेवार आणि रेड हाउस सदस्य इंग्रजी शिक्षिका स्नेहा राजपूत, हिंदी शिक्षक चंचल इंगोले, समाजशास्त्र शिक्षक हर्षल मनोहर, गणित शिक्षक कांचन उके, ग्रंथपाल प्रवीण टोंगे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी शिक्षिका स्नेहा राजपूत यांनी केले. विज्ञान शिक्षक विश्वास हिंगवे व गणित शिक्षिका कांचन उके यांनी राष्ट्रीय योग दिनाविषयी महत्वाची माहिती दिली. शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका के. साई निरजा यांनी सर्वांना संबोधित करून योग दिनाविषयी मार्गदर्शन केले तसेच उपस्थित सर्वांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.