क्राइम

इंस्टाग्राम वरील मैत्री महागात ,तरुणीवर सात नराधमांकडून सोळा महिने बलात्कार

Spread the love

गुजरात / नवप्रहार डेस्क

                  इंस्टाग्राम वरील मैत्री एका तरुणीला चांगलीच महागत पडली आहे. कथित मित्राने तिला नाश्ता करण्याच्या बहाण्याने बोलवून तिचे व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करत सात नराधमांनी तिच्यावर सोळा महिने वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

उपलब्ध माहिती नुसार पालनपूर येथील तरुणीशी 2023 मध्ये आरोपींपैकी एकाने इन्स्टाग्रामवरून मैत्री करत तिला एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी बोलावले. आरोपीने जाणीवपूर्वक तिच्या कपड्यांवर अन्न सांडले आणि ते साफ करण्याच्या बहाण्याने एका खोलीत नेले आणि ती बाथरूममध्ये कपडे बदलत असताना विशाल चौधरी नावाचा आरोपी आत शिरला आणि तिचे व्हिडीओ काढून इन्स्टाग्रामवर व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. शारीरिक संबंध ठेवण्यास तिला भाग पाडले गेल्याचा आरोपही तिने केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close