श्रीगोंदा ता.अहिल्यानगर जि. मध्ये सुरक्षा संघातर्फे शाळांची तपासणी

श्रीगोंदा /प्रतिनिधी
राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ व शिक्षण विभागाकडून श्रीगोंदा तालुक्यातील शाळांची विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतीत तपासणी श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय श्रीगोंदा करण्यात आली. यात श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,श्रीगोंदा मुली ,ता. श्रीगोंदा या शाळांना भेट देऊन तपासणी करण्यात आली.
पंचायत समिती श्रीगोंदा चे शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी कुसुम कानडी केंद्रप्रमुख माणिकराव आढाव मुख्याध्यापिका आवटी व्ही एन भोईटे आनंदकर बी .बी उपमुख्याध्याप कातोरे रमेश पाटोळे शिक्षक सामाजिक कार्यकर्ते सचिन गोंटे पत्रकार माधव बनसुडे व तसेच राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ (नवी दिल्ली) उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशचे शामू लोंढे यांनी तपासणी केली. या विद्यालयांची तपासणी करत असताना सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, तक्रार पेटी इ. याबाबतची
राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ व शिक्षण विभागाकडून शाळांची तपासणी.
माहिती घेण्यात आली. गटशिक्षणाधिकारी कुसुम कानडी व राष्ट्रीय मानव अधिकारचे उपाध्यक्ष शामू लोंढे यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षाव्यवस्था व सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. तक्रार पेटीबाबतचे महत्त्व पटवून दिले. यावेळी या विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या भेटीमुळे सर्व शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षिततेबाबतच्या सूचनांचे
व्यवस्थितरित्या पालन करून सर्व समित्यांचे ठराव रजिस्टर, तक्रारपेटी अद्ययावत केले असून शिक्षण विभागाकडून व राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ यांच्याकडून विशेष कौतुक करण्यात आले. येथील मुख्याध्यापकांनी सहकार्य केले. आज दिनांक १२/११/२०२५
