क्राइम
वाळू माफियाची कोतवालास अमानुष मारहाण

फावडा आणि लोखंडी सळीने मारहाण ; नदीपात्रातच केली मारहाण
नायब तहसीलदारांचे वाळू माफियांना कथित पाठबळ

धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
तालुक्यातील वाळू माफियांची हिम्मत किती वाढली आहे हे तालुक्यातील हिरपूर येथे सकाळी 9.15 वा . चे दरम्यान घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे. अवैध वाळू उपसा करण्यास कोतवालणे मज्जाव केल्यावर संतापलेल्या वाळू माफियाने कोतवाल ला अमानुष मारहाण केली आहे. संदीप वंजारी असे त्याचे नाव असल्याचे फिर्यादी कोतवाल विलास नारायण ठाकरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
फिर्यादी विलास नारायण ठाकरे ( कोतवाल ) याने तक्रारीत म्हटले आहे की तो सकाळी स्वतःच्या मालकीच्या शेतातुन चक्कर मारून परत हेत असतांना त्याला त्यांच्या गावातील लेंडी नाल्यातून चार ते पाच अनोळखी इसम नाल्यातून वाळूचा उपसा करीत असल्याचे दिसल्याने त्याने कर्तव्याचा एक भाग म्हणून त्यांना हटकून उपसा न करण्याचे बजावले. ठाकरे यांनी या बाबत तलाठी विनोद मस्के यांना मोबाईल वर याबद्दल माहिती दिली. मस्के यांनी पोलीस पाटील विनोद बाबरावजी बीरे यांना सोबत घेऊन वाळू उपसा करणाऱ्या इसमांना आडकाठी आणण्यास सांगितले.
फिर्यादी कोतवाल जेव्हा पोलीस पाटील बीरे यांना घेऊन नाल्यात गेला तेव्हा रेती काढणाऱ्या त्या इसमांना हटकले असता ते टोपले व फावडे नदीपात्रात टाकून निघून गेले. त्यानंतर काही वेळाने आरोपी संदीप वंजारी हा त्या ठिकाणी आला आणि त्याने कोतवाल ठाकरे यांना फावड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.दरम्यान त्याला पाण्यात बुडवण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे समजते.
ठाकरे यांना मारहाण सुरू असताना अजय धुर्वे , नितीन सारवे यांनी संदीप वंजारी याला मला सोडण्यास सांगितले.हा सगळा प्रकार त्याठिकाणी उभा असलेल्या विजय कावडे याने त्याला मला सोडण्यास सांगितले. तेव्हा कुठे त्याने मारहाण करण्याचे थांबवले. त्यांनतर मी नाल्याच्या काठावर येऊन बसलो. तेव्हा पोलीस पाटील आणि अन्य तीन लोकांनी मला धाडस दिले. त्यांनतर मी तळेगाव दशासर ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. त्यावरून संदीप वंजारी याच्या विरोधात अप क्र व कलम :- 281 /2023 कलम 353, 333,504,506, भादवि गुन्हा दाखल करण्यात आला.
नायब तहसीलदारांच्या वरदहस्तामुळे वाळू माफिया शेफारले – सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार तहसील मधील एका नायब तहसीलदारांचे वाळू माफियांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. त्याने तालुक्यात सोडलेले एजंट ज्याच्या कडून बिदागी मिळाली त्याचे नाव यांच्याकडे देतात. आणि हा त्यांच्या विरोधात कुठलीही कारवाई करत नाही.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी या महाशयांना येथून हलवणे आवश्यक – जो पर्यंत हा अधिकारी येथे आहे. तो पर्यंत वाळू माफिया तलाठी ,मंडळ अधिकारी यांना अगदी हीन वागणूक मिळेल असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. जो पर्यंत हा अधिकारी या ठिकाणी राहणार तो पर्यंत वाळू माफिया कोणाला जुमाणणार नाही असेही म्हटल्या जात आहे.
हे आहे त्या मागील कारण – सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार या अधिकाऱ्याचे ज्याच्या सोबत देवाणघेवाण होते.त्याला तू काही काळजी करू नको काही झाल्यास मी सांभाळून घेतो असा दम देतो.आणि याच कारणामुळे वाळू माफिया महसूल विभागातील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना चिल्लर समजतात आणि मनमर्जी करतात.
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज – एकीकडे तहसीलदार म्हणून परिविक्षाधीन अधिकारी वसीमा शेख या तहासिलचा कारभार सांभाळत आहे. महिला असतांना सुद्धा त्यांनी वाळू माफियांवर वचक निर्माण केला होता. पण त्यांना अंधारात ठेवून कारवाईच्या नावावर नायब तहसीलदार खिशे गरम करून घेत असल्याचे बोलल्या जात आहे.त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे.