शिक्षकाचे स्थान समाजात सदैव आदरणीय असते
सौ. संगीताताई अढाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष .
*अध्यापक उमेश नेरकर यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार संपन्न*
बाळासाहेब नेरकर कडून
राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे शिक्षक हे समाजात सदैव आदरणीय असतात असे प्रतिपादन अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ संगीता ताई आढाव यांनी केले. त्या तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बेलखेड केंद्रातील मालठाणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे अध्यापक उमेश नथुजी नेरकर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित सत्कार सोहळ्यात बोलत होत्या.
खेड्यापाड्यातील ग्रामीण समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचे कार्य जिल्हा परिषदेच्या शाळांमधून होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षकांनी शिकवताना करण्याचे आवाहनही जि. प. अध्यक्ष अढाऊ यांनी यावेळी उपस्थित शिक्षकांना केले. यावेळी मंचावर सत्कारमूर्ती उमेश नथुजी नेरकर, सौ. नेरकर, प्रमुख अतिथी म्हणून पतसंस्था संचालिका सारिका देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश तायडे, उपाध्यक्ष सौ. सीमा दामोदर, केंद्रप्रमुख दीपक दही सेवानिवृत्त शिक्षक संजय गिऱ्हे, नागोराव खारोडे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ अकोला जिल्हा अध्यक्ष मनोहर शेळके, प्रयोगशील शिक्षक तुळशिदास खिरोडकार, डॉ. पंजाबराव धामोळे उपस्थित होते. यावेळी शाळा व गावकऱ्यांच्या वतीने उमेश नेरकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. परीसरातील शिक्षक, मित्र व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त शिक्षक नेरकर यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.
यावेळी उमेश नेरकर यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा गौरव करणारे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. उमेश नेरकर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थी पालक व गावकरी यांना मिष्ठांन्न भोजन देण्यात आले. सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक अरुण निमकर्डे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवेंद्र धामोडे,भाविका सोळंके,संदीप तायडे,शैलेश गहरवार,राजू भाऊ,रामसिंग मालवे,रामसिंग पवार, दत्तात्रय काका, मनीष गिऱ्हे, गोपाल गिऱ्हे , उमेश तिडके, प्रवीण चिंचोळकार,बाहकर सर,ताठे सर,अशोक राऊत, मनोहर मोकळकर,ओमप्रकाश निमकर्डे, प्रमोद पोके, अविनाश देशमुख, गजानन गायगोळ, राजपाल सुरळकार, निखिल गिऱ्हे, गोपाल मोहे, श्रीकृष्ण वाकोडे, राजेंद्र दिवनाले, अमोल ढोकणे, पवन ठाकूर सर, वानरे सर व सर्व समस्त गावकरी व श्री. शिवप्रतिष्ठाण मित्र मंडळ मालठाणा यांनी परिश्रम घेतले.