राजकिय

इंडिया आघाडीची ताकद वाढणार ; 15 खासदार असलेला पक्ष या सोबत जुळज्याची शक्यता 

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क

                    लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय समीकरण झपाट्याने बदलताना दिसत आहे. निवडून आलेले अपक्ष खासदार एकामागून एक इंडिया आघाडी सोबत जुळतं आहेत. अश्याताच आता इंडिया आघाडी साठी शुभ संकेत मिळत आहेत. 15 खासदार असलेला एक पक्ष इंडिया आघाडीत समाविष्ट होईल असे भाकीत केल्या जात आहे.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि YSR काँग्रेस पक्षाचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांनी नुकतीच दिल्लीत निदर्शने केली. राज्यात अलीकडेच सत्तेत आलेल्या तेलुगू देसम पक्षाच्या सरकारने आपल्या पक्षाविरोधात हिंसक भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या भूमिकेला इंडिया आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हा पक्ष इंडिया आघाडीसोबत येण्याचे संकेत मिळत आहेत.

YSR काँग्रेस पक्षाचे जगन मोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी तेलुगू देसम पक्षाच्या सरकारविरोधात दिल्लीत निदर्शने केली. यावेळी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी रेड्डी यांच्या निदर्शनात सहभाग घेऊन त्यांना पाठींबा दिला. त्यामुळे वायएसआर काँग्रेस इंडिया कॅम्पमध्ये सहभागी होऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेचे वास्तवात रुपांतर झाल्यास इंडिया आघाडीचे राज्यसभेत स्थान बळकट होईल.

YSR काँग्रेसचे लोकसभेत चार खासदार आहेत. पण, त्यामुळे इंडिया आघाडीला लोकसभेत आवश्यक तेवढे संख्याबळ मिळणार नाही. परंतु, राज्यसभेमध्ये मात्र नक्कीच बदल दिसेल. राज्यसभेत YSR पक्षाचे 11 खासदार आहेत. हा पक्ष इंडिया आघाडीत आल्यास राज्यसभेत इंडिया आघाडीचे संख्याबळ 11 ने वाढेल. यामुळे संसदेच्या वरिष्ठ सभागृहात इंडिया आघाडीची स्थिती खूप मजबूत असेल.

राज्यसभेत एकूण 245 जागा आहेत. परंतु 19 जागा रिक्त असल्याने संसदेच्या उच्च सभागृहाचे एकूण संख्याबळ सध्या 226 इतके आहे. अशा स्थितीत राज्यसभेतील संसदेचा जादुई आकडा 113 होतो. सध्या राज्यसभेत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीला बहुमताच्या आकड्यापेक्षा 13 जागा कमी आहेत. राज्यसभेत भाजपच्या 86 जागा असून एनडीएचे एकूण 101 खासदार आहेत. तर, विरोधी भारत आघाडीचे राज्यसभेत 87 खासदार आहेत. त्यापैकी 26 काँग्रेसचे आणि 13 तृणमूल काँग्रेसचे आहेत. राज्यसभेत आम आदमी पार्टी आणि द्रमुकचे प्रत्येकी 10 खासदार आहेत. अशावेळी वायएसआर काँग्रेस इंडिया आघाडीत सामील झाल्यास विरोधी आघाडीच्या एकूण खासदारांची संख्या 98 वर पोहोचेल. यामुळे मोदी सरकारला राज्यसभेत कोणतेही विधेयक मंजूर करणे फार कठीण जाऊ शकते.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close