अपघात

अपघात की घातपात; २ महिन्यांपूर्वी बेपत्ता तरुणाचा कुजलेल्या स्थितीत सापडला मृतदेह 

Spread the love

किनवट /.नवप्रहार ब्युरो 

               सकाळी कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेला सचिन तो कायमचाच. सचिन घरी परत न आल्याने नातेवाईक आणि मित्रमंडळीत शोधाशोध सुरू झाली. काहीच पत्ता लागत नसल्याने पोलिसात तक्रार दाखल झाली. काल शेतात ट्रॅक्टर वर काम करणाऱ्या  व्यक्तीला रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत दुचाकी आणि मृतदेह दिसल्याने त्याने किनवट पोलिसांना माहिती दिली.

                  पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपासाला सुरवात केली. तेव्हा तालुक्यातील गोकुंदा येथील सचिन गंगाधर आरपेल्लीवार (वय २०) हा २७ फेब्रुवारी पासून बेपत्ता असल्याचे समजले.

सचिन हा २७ फेब्रुवारी रोजी सकाळी कामासाठी घरातून बाहेर पडला होता. परंतु तो घरी न परतल्याने नातेवाईकांनी व पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. याच दरम्यान, रविवारी सकाळी महामार्गालगत शेतात नांगरणी करताना ट्रॅक्टर चालकाच्या नजरेस रस्त्याच्या कडेला नालीत एक दुचाकीसह पडलेली व्यक्ती आढळली. त्याने तातडीने किनवट पोलीस ठाण्यात ही माहिती दिली.

बीट जमादार संग्राम मुंडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करताना एमएच २९ बीएस ८६०६ क्रमांकाची मोटारसायकल व त्याच्या खाली सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी मिळालेल्या ‘मिसिंग’ नोंदीनुसार व कपडे व मोबाईलवरून मृताची ओळख पटवली. नातेवाईकांच्या पुष्टीने मृत व्यक्ती सचिन आरपेल्लीवार असल्याचे निश्चित झाले.

शवविच्छेदन करून मृतदेह वडील गंगाधर भूमन्ना आरपेल्लीवार यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अपघात झाला की अन्य कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला. याचा तपास किनवट पोलीस करत आहेत. पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संग्राम मुंडे पुढील तपास करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close