रोवणी करणाऱ्या महिलांवर आणि शेतात कामं करणाऱ्या तरुणावर विज कोसळली.
दोन महिला ठार तीन जखमी. ; तरुणाचा मृत्यू
निलज (खुर्द) येथील घटना.
मोहाडी. ता. प्र.
मोहाडी तालुक्यातील निलज (खुर्द) येथे रोवणी करण्या करिता गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नवेझरी येथील 20 महिला आल्या होत्या दि.21 जुलै रोजी दुपारी 4 वा. विज पडून 2 महिला ठार तर 3 महिला जखमी झाल्या. दरम्यान शेतात काम करणाऱ्या 35 वर्षीय तरुणावर वीज पडून त्याचा देखील मृत्यू झाला आहे.
सध्या चहू बाजूला धान पिकाची रोवणी जोमात सुरू आहे त्या मुळे जिकडे जास्त रोजी मिळेल तिकडे महिलांचे जत्थे मिळेल त्या खाजगी वाहनाने जात आहेत.
( वीज कोसळल्याने जखमी महिला )
मोहाडी तालुक्यातील निलज (खुर्द) येथील शेतकरी सूर्यप्रकाश (बंडू) बोंद्रे यांच्या शेतावर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नवेझरी येथील 20 महिला शिवलाल बोंद्रे यांच्या जीप गाडीने रोवणी करण्या करिता आल्या होत्या दि.21 जुलै रोजी दुपारी 4 वाजे विज कडाडण्या सह पावसाने हजेरी लावली त्याच वेळी बोंदर यांच्या शेतावर जांबेच्या झाडावर विज पडली याच शेतात काम करत असलेल्या महिलांना त्याची झल पोहचून लता मनोहर वाढवे 50 वछला गुलाब सिंह यादव(बावनथडे) 50 यांचा जागीच मृत्यू झाला तर निर्मला रामकृष्ण खोब्रागडे 50 सुलोचना लाला सिगणजुडे 55 बेबी मुकुंदा सोयाम 55 ह्या जखमी झाल्या त्यांना प्रा. आ.केंद्र.करडी येथे उपचार करून भंडारा येथे रेफर करण्यात आले आहे.
सदर घटनेची माहिती जि. प.सदस्य महादेव पच घरे यांना आधी देण्यात आली त्यांनी लगेच डॉक्टर यांना सूचना देवून दवाखान्यात हजर राहण्यास सांगितले त्या मुळे दवाखान्यातील स्टॉप हजर राहिले.
दरम्यान युवराज दामा भीमटे (35) रा. कान्द्री हा बोन्द्री (कान्द्री) येथील शेतकरी तुकाराम तुमसरे यांच्या शेतात काम करत असताना दु. 3.30 च्या सुमारास त्याच्यावर वीज कोसळली त्यात त्याचा मृत्यू झाला.
(मृतक युवराज दामा भीमटे, 35 रा.कान्द्री)
तहसीलदार सुरेश वाघचौरे यांनी रुग्णालयात येवून भेट दिली तसेच करडी पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड व कर्मचारी यांनी भेट देऊन घटना पंचनामा केला आहे.