क्राइम

महिलेवर बलात्कार करून हत्या ; हिंगणा पो. स्टे.परिसरातील घटना 

Spread the love

नागपूर / नवप्रहार मीडिया 

         हिंगणा ठाण्याच्या हद्दीतील समृध्दी महामार्ग ला लागून असलेल्या वडगाव गुजर परिसरात ऐका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबल माजली आहे. महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. मृत महिलेची ओळख पटली नसून हिंगणा पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री एकापेक्षा अधिक मारेकरी कार अथवा अन्य वाहनाने महिलेला घेऊन समृद्धी महामार्गालगतच्या वडगाव गुजर परिसरात निर्जनस्थळी आले. तेथे त्या महिलेवर बलात्कार केला. धारदार शस्त्राने गळा चिरुन तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह सुमारे १०० मीटर अंतरावर फेकून मारेकरी पसार झाले. मंगळवारी दुपारी एक नागरिक परिसरातून पायी जात असता त्याला रस्तावर रक्त पडलेले दिसले. भीतीमुळे त्याने कोणाला सांगितले नाही. परंतु दुपारी हिंमत करून त्याने गावातील दोघांना माहिती दिली. एका ग्रामस्थाने हिंगणा पोलिसांना ही घटना कळविली.

ग्रामस्थांकडून घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पाहणी केली असता महिलेचा गळा धारदार शस्त्राने चिरला होता. मृतदेहापासून काही अंतरावर महिलेचे कानातले दागिने आणि चप्पल पडली होती. तसेच सदर परिसरात पोलिसांना काही आक्षेपार्ह वस्तूही आढळल्या आहेत. त्यामुळे बलात्कार केल्यानंतर महिलेचा खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी पंचनामा करून महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील शोध सुरू केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारेही पोलीस मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close