राणे हॉस्पिटल येथे लोकार्पण-प्रवचन व स्मृति व्याख्यान
अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीनचा लोकार्पण व विविध सामाजिक कार्याचे आयोजन..
आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची राहणार उपस्थिती ….
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : येथील मागील 21 वर्षापासून अविरत रुग्णसेवेत असणाऱ्या राणे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आर्वी येथे परिसरातील प्रथमच प्रारंभ झालेल्या अत्याधुनिक मल्टीस्लाईस सिटीस्कॅन मशीनचे लोकार्पण रविवार दिनांक 10/9/2023 ला रुक्मिणी पीठ अंबिकापुर-कौडण्यपुर पीठधीश्वर स्वामी अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी श्री राजेश्वर नंदाचार्य (समर्थ राजेश्वर माऊली सरकार) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे .
तसेच या निमित्ताने सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत भव्य रक्तदान शिबिर व गरजू महिलांसाठी मोफत स्तन व गर्भाशय कॅन्सर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . या रक्तदान शिबिरात इच्छुक रक्तदात्यांनी तसेच या मोफत कॅन्सर तपासणी शिबिरात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक डॉ. रिपल राणे, डॉ. कालिंदी राणे यांनी नागरिकांना केले आहे.
याप्रसंगी सायंकाळी सहा वाजता निमंत्रितासाठी स्वर्गीय श्री रमेशराव राणे यांच्या प्रथम स्मृती वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज डॉ. श्रीमंत राजे मुधोजी भोसले नागपूर यांच्या अध्यक्षतेत सुप्रसिद्ध वक्ते संत साहित्यिक विचारवंत हरिभक्त परायण डॉ. नारायणजी निकम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे