राजकिय

राहुल गांधींचे ते विधान त्यांच्या वैफल्यग्रस्ततेचा परिचय

Spread the love

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नखाची बरोबरी न करणाऱ्या आणि ज्यांना भारताच्या स्वातंत्र्याबद्दल तसेच मातृभूमी करिता कोणाचे किती बलिदान आहे कसे बलिदान आहे हे सुद्धा माहित नसणाऱ्या माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मी सावरकर नाही असे  म्हणून सावरकरांचा अपमान करणाऱ्या  राहुल गांधीचा मी तीव्र शब्दात निषेध नोंदवितो त्याचे ते विधान म्हणजे त्यांच्या वैफल्यग्रस्ततेचा परीचय देत असल्याचे म्हटले.

निषेध नोंदविण्याकरिता आगामी काळात भारतीय जनता पक्ष व आमच्या सर्व घटकांच्या माध्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर सन्मान यात्रा निघणार असल्याची माहिती आमदार प्रताप अडसड यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली  या सन्मान यात्रेत धर्म, जाती, पंथ न मानता सर्वच धर्मातील राष्ट्रभक्तांनी सामील होण्याचे आवाहन अडसड यांनी केले

अडसड यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलले की, काही लोक स्वस्वार्थाकरिता चुकीचा इतिहास सांगण्याचा किंवा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात दोन वेळा काळ्यापाण्याची शिक्षा भोगणाऱ्या,लाखो युवकांचे हृदय स्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अशा स्वार्थी लोकांनी किमान स्वतंत्र करिता लढा देणाऱ्या  योद्धांबद्दल  बदनामीकारक शब्द वापरू नयेत अन्यथा भविष्यात हे बरे होणार नाही असेही अडसड म्हणाले

पत्रकारांनी महाविकास आघाडीमध्ये सामील उद्धव ठाकरे बद्दल विचारले असता अडसड म्हणाले की, शिवसेनेच्या इतिहासात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांविरोधात बोलणाऱ्याच्या थोबाडीत मारली होती तर दुसरीकडे सत्तेच्या स्वार्थापोटी उद्धवजीचे लाडके संजय राऊत राहुल गांधीना समजवण्याची भाषा करताना दिसतात याचा अर्थ जनतेनेच काढावा पत्रकार परिषदेला भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष गिरीश भुतडा उपस्थित होते

—————————————————-

आपले अस्तित्व टिकविण्याकरिता जगताप सावरकरांचा विरोध करतात….अडसड

धामणगाव रेल्वे मतदार संघाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप सावरकर यांच्या विरोधात बोलले याबाबत विचारले असता आमदार अडसड म्हणाले की, स्वतः प्राध्यापक असताना सुद्धा आणि इतिहास माहीत असताना सुद्धा केवळ राहुल गांधी पर्यंत आपले नाव जावे आणि मी सावरकरांचा विरोध करतो आहे म्हणून जवळीक साधता यावी तसेच आपले अस्तित्व काँग्रेसमध्ये टिकवण्याकरिता म्हणून जगताप विरोध करीत असल्याचे अडसड म्हणाले

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close