गांधी विद्यालयात दोन निवृत्त शिक्षकांचा निरोप समारंभ संपन्न

स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या मा. श्रीमती शुभांगी इंगोले यांनी वर्ग 10 वी,12 वी आणि एन सी सी विभागातून प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक एक हजार रुपये रोख रक्कम देण्याचे आश्वासन दिले.
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : स्थानिक नगरपरिषद गांधी विद्यालय येथे आज दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 1 या कालावधीत दोन शिक्षकांचा निरोप समारंभ करण्यात आयोजीत करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य विश्वेश्वर पायले सर , सत्कारमूर्ती मा. शुभांगी रिधोरकर मॅडम आणि मा. विष्णू जी चौधरी सर तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती ज्योती अजमिरे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यामधुन कैलास भाऊ कुऱ्हाडे तसेच भागवत रिधोरकर आणि चौधरी सरांच्या पत्नी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांना एनसीसी पायलट सुजल चव्हाण आणि निशांत जोध यांनी कार्यक्रम स्थळी सन्मानाने आणले .त्यानंतर सावित्रीबाईंच्या विचार प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक नितीन बोडखे सरांनी केले . तीन वर्षे आधीच स्वच्छ निवृत्ती घेतलेल्या रिधोरकर मॅडम यांचे सोबत त्यांच्या कुटुंबासोबत शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह , आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच चौधरी सरांचा सुद्धा संपत्निक सत्कार करण्यात आला .एनसीसी विभागाच्या वतीने पायलट आणि एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे यांनी देखील एनसीसी सन्मान चिन्ह देऊन सत्कारमूर्तींचा सत्कार केला. त्यानंतर शाळेमधून मॅडमची मुलगी कू वैष्णवी पुण्याहून काही कारणाने येऊ शकत नसल्यामुळे तिचे मनोगत जुनिअर कॉलेज विभागाच्या स्वप्ना फुलंबरकर मॅडम यांनी वाचून दाखवले .तसेच प्रमोद नागरे ,संजय किते ,स्मिता बीजवे, रोशन शेख ,करण न्याहारे ,चौकोने सर , नावेद गणी सर आणि ज्योती अजमिरे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सत्काराला उत्तर म्हणून श्री वी सी चौधरी यांनी आणि नंतर कु. शुभांगी इंगोले मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्कारमूर्ती यांनी शाळेप्रती असलेले आपल्या भावना व्यक्त केल्या. रिधोरकर मॅडमनी आपणही शाळेचे काही देणे लागतो यासाठी प्रत्येक वर्षी दहावी, बारावी आणि एनसीसी विभागातून प्रथम येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना एक एक हजार रुपये रोख देण्याचे घोषित केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी थोर महापुरुषांच्या पुस्तकांचा संच देण्याचे सुद्धा आश्वासन दिले त्यांचे शाळेच्या वतीने प्राचार्य यांनी अध्यक्षिय भाषणात आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन कु. हर्षदा कडू मॅडम आणि कु.दिव्यांनी मुरतकर मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक विजय शेंडे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यालय तसेच कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.