गांधी विद्यालयातील वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

विद्यार्थ्यांनी दहावीनंतरच्या प्रत्येक क्षेत्रात आपले , कुटुंबाचे आणि शाळेचे नाव उज्वल करावे — ऍडव्होकेट अल्काताई काळे
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : स्थानिक नगर परिषद गांधी विद्यालय मध्ये दिनांक 24 फेब्रुवारी शनिवारला सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत वर्ग नववा वर्ग कडून वर्ग 10 वी ला निरोप समारंभ आयोजित केला होता.
निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य विश्वेश्वर पायले यांनी भूषविले तसेच प्रमुख अतिथी म्हणून एडवोकेट अलकाताई काळे , शुभांगी इंगोले ज्योती अजमिरे ,संजय किटे हे विचार पिठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभ मान्यवरांचा वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे स्वागत गीत म्हणून स्वागत केले क्रांतीज्योती सावित्रीच्या विचार प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर प्रास्ताविक वर्ग नववीचे वर्गशिक्षक तिरंदाज देशमुख सरांनी केली आणि कार्यक्रमाची रूपरेषा मांडली त्यानंतर वर्ग नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांनी आपले शाळेविषयी अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केले त्यानंतर एडवोकेट अलकाताई काळे यांनी रसायनशास्त्र या विषयात वर्ग बारावी मधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थीला विद्यार्थिनींना रोग पारितोषिकांनी स्मृतिचिन्ह प्रदान केले तसेच संजय किटे सरांच्या स्मृतिषेश मातोश्री वर्ग दहावी मधून इंग्रजी विषयांमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. त्यानंतर मेजर हेमंत जकाते यांच्या कडून वर्ग दहावी आणि बारावी तसेच एनसीसी छात्रसनिकांमधून प्रथम द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि पारितोषिक देण्यात आले तसेच शाळे कडून सुद्धा वर्ग दहावी आणि बारावी मधील विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले सोबतच एनसीसी विभागाच्या वतीने अधिकारी प्रमोद नागरे यांनी अ प्रमाणपत्र परीक्षेमध्ये विशिष्ट ग्रेड मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच यावर्षीची एनसीसी मधली सर्वोत्कृष्ट कॅडेट कु.अमृता झाडे हि ला स्मृतिचिन्ह प्रधान करण्यात आले. त्यानंतर प्रमुख अतिथी यांनी तसेच प्राचार्य पायले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला विद्यार्थ्यांना शाळेच्या बगीचा मध्ये अल्पउपहार व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाचे संचालन वर्ग नववीच्या विद्यार्थिनी कु. श्रद्धा थोरात आणि कु. सई नागरे यांनी केले तर आभार प्रदर्शन वर्गशिक्षिका सौ.स्मिता बीजवे यांनी केले. कार्यक्रमाला वर्ग नववी आणि दहावीच्या सर्व विद्यार्थी सर्व शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.गांधी विद्यालयातील वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.