यवतमाळ जिल्ह्यात ना. मा. संजयभाऊ राठोड यांच्या प्रयत्नाने जी.प. शाळेचे होणार कायापालट
(अरविंद वानखडे)
यवतमाळ –यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग अधिनस्त जिल्हा परिषद प्राथमिक उच्चमाध्यमिक शाळांमध्ये मॉडेल स्कूल ची निर्मिती करण्यात येणार असून यासाठी जिल्हा खणीकर्म अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती ना. संजय राठोड यांनी दिली आहे.
यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले असून सकारात्मक चर्चा करण्यात येईल अशी माहिती त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनांक घोष तसेच शिक्षणाधिकारी यांना दिली आहे. दरम्यान याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी दिली.
२०२३,२४ या आर्थिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणाची निर्मिती करण्याकरिता आणि त्याच पद्धतीचे शिक्षण देण्याकरिता यवतमाळ जिल्ह्यात १६ ही तालुक्यामध्ये एकूण ५८ मॉडेल स्कूलचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे या मॉडेल स्कूलमध्ये खेळण्याचे साहित्य संशोधक वृत्ती वाढीस लागण्याकरिता सुसज्ज अशी प्रयोगशाळा, रंगरंगोटी केलेल्या अल्हाददाय अशा वर्गखोल्या निर्मित करण्यात येणार आहे. या संकल्पनेचे डिझाईन तयार करण्यात आले असून त्याबाबतचे प्रस्ताव देखील तयार करून शासनाकडे रवाना करण्यात आले आहे.
मॉडेल स्कूल साठी आर्णी तहसील मधील तळणी , बाबुळगाव, दारव्हा मधील बोधेगाव धामणगावदेव लोही ,मांगकिनी, दिग्रस तालुक्यातील लाख मांडवा मोख रुई लहान साखरा सावंगा बुद्रुक सिंगद तूप टाकळी घाटंजी मधील ईजाळा, कळम मधील देवनाळा महागाव मधील तुळशी नगर मारेगाव मधील कुंभा कोलगाव सराटी मजरा हट मांजरी कोसारा मारेगाव पीसगाव मार्डी नेर मधील बानगाव माणिकवाडा , सोनवाडी पांढरकवडा येथील उर्दू हायस्कूल राळेगाव मधील वडकी उमरखेड मधील कोरटा धनज वनी मधील भालर लाल गुडा रागना वेळाबाई मेंडोली मंदर शिंदोला सुकणेगाव परसोनी यवतमाळ मधील मोहा बोरीसिंह लासीना जरी मधील बाळापुर कोसरा मुकुटबन कमळ वेली गवरा मंगली सतपल्ली शिबला सुरला इत्यादी बाधित अबाधित गावांमध्ये समिती करण्यात येणार आहे. यासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे यातील काही खर्च शासन स्तरावर तर काही खर्च जिल्हा खणीकर्म अंतर्गत दिल्या जाणार आहे. यासाठी ना. संजय राठोड हे विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती नुकतीच शिक्षणाधिकारी किशोर पाळोदे यांनी दिली.
मॉडेल स्कूल्समध्ये गणित आणि विज्ञान या विषयांचे शिक्षण इंग्रजीतून दिले जाईल. तर इतर विषयांसाठी सेमी इंग्रजी माध्यमाचा उपयोग केला जाईल. दहाव्या इयत्तेनंतर विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अडसर ठरू नये, यासाठी हा प्रयोग केला जाणार आहे. याशिवाय इ-क्लासरूममध्ये संगणक प्रयोगशाळा, चांगल्या दर्जाचे इंटरनेट कनेक्शन, टीव्ही, पुरेशा संख्येने शिक्षकांची उपलब्धता, २४ तास विजेसाठी सौरऊर्जा प्रकल्प, संरक्षक भिंती आदी सुविधा यात पुरविण्यात येतील. ‘बिल्डींग अॅण्ड लर्निंग एड’ या संकल्पनेवर आधारीत या शाळा विद्यार्थ्यांना परिसरातून पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून अनुकूल असतील याचाही विचार केला जाणार आहे. इयत्ता पहिली ते सातवी व शक्य झाल्यास आठव्या इयत्तेपर्यंतचे वर्ग येथे असतील.