अचलपुर येथे आयोजित तीन दिवसीय भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पुरुष अचलपूर केसरी चा मानकरी ठरला पोपट घोडके तर महिला मधुन सोनाली मंडलिक
अचलपूर (प्रतिनिधि):किशोर बद्रटिये –-अचलपुर शहरांतील विठ्ठलवाडी मैदानावर संपन्न झालेल्या तीन दिवसीय भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये पुरुष अचलपूर केसरी मध्ये पोपट घोडके व महिला मधुन सोनाली मंडलिक यांना बहुमान मिळाला आहे .यावेळी मंचावर उपस्थितीत भाजपा पक्षाचे विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे ,भाजपा पक्षाचे गजानन कोल्हे ,भाजपा पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रसे,संजय तिरथकर,मनोहर सूने ,सोमेश खानझोडे आदी मान्यवरांच्या हस्ते लाखो रुपयाचे बक्षीस विजेत्या पैलवानांना वितरित करण्यात आले . या स्पर्धेमध्ये पुरुषांमध्ये अचलपूर केसरी प्रथम बक्षीस चा मान पटकाविणारे पोपट घोडके यांना अचलपूर केसरी चांदीची गदा , व ७१ हजार रुपये रोख .द्वितीय पुरस्कार तुषार दुबे यांना ३५ हजार रुपये ,रवी चव्हाण यांना तृतीय पुरस्कार ११ हजार रुपये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सोमेश सुनील खानझोडे यांच्या वतीने खानझोडे कन्स्ट्रक्शन द्वारा मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली .तसेच महिला गटात अचलपूर केसरी विजेत्या सोनाली मंडलिक यांना
३१ हजार रुपये , द्वितीय प्रणाली पूरडे यांना १५ हजार रुपये तर तृतीय पुरस्कार म्हणून ईश्वरी होलमुके यांना ७ हजार रुपये आणि खानझोडे कन्स्ट्रक्शन द्वारा चांदीची गदा देखील विजेता महिला स्पर्धकांना देण्यात आली . श्री हनुमान व्यायाम मंडळ बिलनपुरा अचलपूर द्वारा संपन्न झालेल्या भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत राज्यातील विविध प्रसिद्ध पैलवानानी सहभाग घेतला .यावेळी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. तसेच महिला आणि पुरुषां व्यतिरिक्त १७ वर्षा खालील कुमार कुमारिका गटाचेही स्पर्धेत रोम हर्षक सामन्यामुळे पैलवानांनी प्रेशकाची मने जिंकली . यावेळी माणिक देशपांडे,विनिता धर्मा,निलेश सातपुते,राजेंद्र जयस्वाल, राम भरोसे गौर ,राम महाराज चुलेट,निलेश तारे,नितीन डकरे, गजानन शर्मा,गजू दीक्षित आदीं मान्यवर उपस्थितीत होते. महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटना व विदर्भ कुस्ती संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न झाली . नुकतीच संपन्न झालेली ही राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा मॅट वर खेळल्या गेली . या भव्य राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा यशस्वीतेसाठी आयोजक अभय माथने , छोटू लाडोळे , निलेश पोटे, चंद्रेश बहोरिया , गजू दीक्षित,धर्मा राऊत,मयंक शर्मा ,श्याम साऊरकर,जय तिवारी , कमलेश केदार ,प्रथमेश आवनकर आदी नी अथक परिश्रम घेतले.