हटके

ती स्विमिंग टॅंक मध्ये पोहत असतांनाच घडले असे की

Spread the love
.

मुंबई / विशेष प्रतिनिधी

                 शारीरिक दृष्ट्या मजबूत राहण्यासाठी अनेक लोकं वेगवेगळे व्यायाम करीत असतात.कोणी पायी चालणे ,कोणी सायकलिंग कोणी जिम तर कोणी स्विमिंग (पोहणे ) या सारखा व्यायाम करीत असतात. स्विमिंग हा सगक्यात चांगला व्यायाम समजला जातो. पण स्विमिंग करतांना हार्ट अटॅक आल्याने एका महिलेचा स्विमिंग टॅंक मध्येच जीव गेला आहे. मुंबईच्या चेंबूर भागामधल्या जनरल अरुण कुमार वैद्य स्विमिंग पूलमधली ही घटना आहे. या घटने नंतर बीएमसी वर देखील ताशेरे ओढण्यात येत आहेत.

ट्रॉम्बेमध्ये राहणाऱ्या 61 वर्षांच्या रेणुका कोळी त्यांचे पती गजानन कोळी यांच्यासोबत ऑक्टोबर 2022 पासून स्विमिंगला येत होत्या. रेणुका मंगळवारी सकाळी 8 वाजता स्विमिंग पूलमध्ये उतरल्या, यानंतर त्यांच्या तोंडातून फेस यायला सुरूवात झाली. स्विमिंग पूल स्टाफने रेणुका यांना बाहेर काढलं आणि जवळच्या दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली असता रेणुका यांना आयसीयूमध्ये भरती करायला सांगितलं.

यानंतर त्यांना लगेच झेन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तिकडे त्यांना मृत घोषित केलं गेलं. महिलेला वेळेत उपचार मिळाले असते तर तिचा जीव वाचला असता, असं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर बीएमसीद्वारा संचलित स्विमिंग पूलच्या प्राथमिक चिकित्सेच्या सुविधांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या स्विमिंग पूलमध्ये फेब्रुवारी महिन्यात दोन जलतरणपटू जखमी झाले होते, तेव्हा त्यांना पब्लिक ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून रुग्णालयात नेलं गेलं होतं, असंही सांगण्यात येत आहे. कोरोना काळाआधी बीएमसीच्या बहुतेक स्विमिंग पूल परिसरात अॅम्ब्युलन्स उभी असायची. या अॅम्ब्युलन्सचा वापर आपत्कालिन परिस्थितीमध्ये स्विमिंग पूलमध्ये काही दुर्घटना घडली तर अपघातग्रस्ताला तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यासाठी केला जायचा. पण कोरोना महामारीनंतर ही सुविधा बंद झाली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close