Uncategorizedराजकिय

६५ वर्षच्या कालावधीत जिल्ह्यतुन ४ महिला आमदार पोहोचल्या विधानसभेत , ४ महिला लोकसभेत

Spread the love

 

मोर्शी(संजय गारपवार)
राज्यात विधानसभा अस्तित्वात आली तेव्हा पासून आज पर्यंत अमरावती जिल्ह्यातील मोर्शी ,दर्यापूर, अमरावती, तिवसा,बडनेरा,धामणगाव रेल्वे, अचलपूर, मेळघाट विधानसभा निर्वाचन क्षेत्रात सार्वत्रिक निवडणुकीत १३ पंचवार्षिक निवडणूकीत आमदारांनी प्रतिनिधित्व विधानसभेत केले आहे.
केंद्र सरकारने नुकताच महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर केले असून लोकसभा व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीत दोन्ही सभागृहात महिलांची संख्या वाढणार आहे. गेल्या ६५ ते ७० वर्षाच्या कालखंडात मोर्शी विधानसभेतुन सन १९८० कालखंडात महिला आमदार म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोकीळाबाई गावंडे यांनी विधानसभेचे प्रतिनिधित्व केले होते. अमरावती शहर व बडनेरा विधानसभा निवडणुकीत सुलभा खोडके यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. त्याचप्रमाणे तिवसा मतदार संघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या एड. यशोमती ठाकूर यांनी सुद्धा विधानसभेत तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्याचप्रमाणे सन १९९९ ला अचलपूर विधानसभा निवडणूक मतदार संघातून वसुधा देशमुख यांनी महिला आमदार होण्याचा मान मिळवीला होता. धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघातून विधानसभा अस्तित्वात आली तेव्हापासून आजपर्यंत एकही महिला आमदार झाली नाही.मेळघाट विधानसभा क्षेत्रातून एकाही महिला आमदार विधानसभेत प्रतिनिधित्व करू शकली नाही. दर्यापूर विधानसभा मतदार संघात अजून पर्यत महिला आमदार निवडून आली नाही आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस व राष्टीय काँग्रेस यांनी महिलांना विधानसभेची तिकीट दिली असली तरी शिवसेना व भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्ह्यात एकाही मतदार संघात महिला उमेदवारांना उमेदवारी दिली नाही.गेल्या सात दशकात अमरावती जिल्ह्यातील ८विधानसभेतुन अंदाजे १०५ आमदार झाले असून यात केवळ चारच महिला आमदारांनी विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे हे विशेष.

अमरावती जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चार महिलांना खासदार होण्याचा मान मिळाला आहे.
सन १९६५ ला विमलबई देशमुख खासदार झाली होती. ,सन १९८०ला उषा चौधरी यांनी खासदारकी भोगली होती .सन१९९१ अमरावती जिल्ह्यातुन महिला खासदार प्रतिभाताई पाटील व त्यानंतर सलग दोन वेळा महिला खासदार म्हणून नवनीत कौर हिने २०१९ लोकसभेचे प्रतिनिधित्व केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close