ग्राम सभेत गावकऱ्यांनी मांडल्या विविध समस्या ; आणि मागणी पूर्ण करण्याची घातली साद
धनज (बु)/ प्रतिनिधी
आज 26 जानेवारी 2024 रोजी ग्रामपंचायत कार्यालय धनज बुद्रुक येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत मध्ये सर्व गावकरी मंडळी सर्व सामाजिक कार्यकर्ते हे उपस्थित होते उपस्थित असताना ग्रामपंचायत मध्ये सरपंच व सदस्य व उपसरपंच सर्वांच्या मते वाचन करण्यात आले वाचन करण्यात आल्यानंतर त्यांनी जनतेचे काय मागणी असेल ते विचारणा केली मागणीमध्ये आम्ही आमच्या गावातील सर्वसामान्य माणसं गोरगरीब माणसं सर्वांची जे काही विषय असतील ते विषय आम्ही आम सभेमध्ये ग्रामसभेमध्ये मांडण्यात आले सर्वप्रथम गावामध्ये मूलभूत गरजा मूलभूत गरजेमध्ये काँक्रीट रस्ता ,नाली ,घरकुलचा प्रश्न व गावठाण अतिक्रमण व वाढीवस्तीचे अतिक्रमण नियमाकुल व्हावें ,अशी मागणी करण्यात आली .तसेच घरकुल मध्ये जे सर्वप्रथम अपंग ,विधवा महिला, प्राधान्य देण्यात यावे. व सर्वसामान्य माणूस ज्यांच्या नावाला घरकुल प्राधान्य आहे असे काही नाव, व घरकुल लाभार्थ्यांना लाभ मिळाला असे काही नाव व काही जणांना घरकुल नाही मिळाले ज्यांना नाही मिळाले त्यांची घरकुल यादी मध्ये समाविष्ट करून ती ,फाईल पंचायत समिती बांधकाम विभागामध्ये मंजूर करण्यात यावी अशी विनंती केली व सर्व गावकरी मंडळींनी ते मान्य केले व ग्रामपंचायतला सांगितले की लवकरात लवकर गावठाण लाभार्थ्यांची घरकुल यादी मध्ये नावाची नोंद व्हावी अशी विनंती केली. व सरपंच धनज बुद्रुक मिलिंद मुंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले