त्या अपघातात सगळेच दगावले पण ४ वर्षीय बालिका चमत्कारिक रित्या बचावली
मुंबई / नवप्रहार डेस्क
जगात काही घटना अश्या घडतात की तुम्हाला ईश्वराच्या उपस्थितीवर भरोसा करावाच लागतो. व्यक्ती कितीही नास्तिक आला तरी घडून आलेल्या चमत्काराला तुम्हाला नमस्कार करणे बाध्य भावे लागते. विमानाचा असाच एक अपघात घडला होता. ज्यात क्रू मेंबर पासून सगळेच अपघातात मेले होते. पण चार वर्षाची चिमुरडी अपत्यक्षित रित्या वाचली होती.
ब्राझीलमधल्या साओ पाउलो राज्यात 9 ऑगस्ट रोजी एका प्रवासी विमानाचा अपघात झाला. या अपघातात विमानातल्या सर्व 61 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय, नेपाळमध्येही एक भयंकर विमान अपघात झाला.
त्या घटनेतही सर्व प्रवासी ठार झाले. या घटनांनी इतिहासातल्या काही भीषण विमान अपघातांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. यापैकी, 16 ऑगस्ट 1987 रोजी झालेला विमान अपघात विशेष मानला जातो. कारण, या अपघातात एक आश्चर्यकारक घटना घडली होती. 1987मध्ये झालेल्या या विमान अपघातात प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह 155 जणांचा मृत्यू झाला होता; पण चार वर्षांची एक मुलगी जिवंत राहिली होती.
माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांनुसार, हा विमान अपघात अमेरिकेच्या इतिहासातला दुसरा सर्वांत प्राणघातक विमान अपघात होता. 17 ऑगस्ट रोजी सकाळी, नॉर्थवेस्ट एअरलाइन्स फ्लाइट 255 ने मिशिगनमधल्या एमबीएस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं. फ्लाइटचा पहिला थांबा अमेरिकेतल्या डेट्रॉइट मेट्रोपॉलिटन वेन काउंटी विमानतळावर होता, तर दुसरा थांबा ॲरिझोना शहरातल्या स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळावर होता.
हे विमान कॅलिफोर्नियातल्या जॉन वेन विमानतळावर उतरणार होतं; पण डेट्रॉइट मेट्रोपॉलिटन वेन काउंटी विमानतळावरच्या पहिल्या थांब्यानंतर उड्डाण करताना विमानाचा अपघात झाला. रेल्वे पुलाजवळ विमान कोसळलं होतं. 57 वर्षांचे जॉन आर. मॉस फ्लाइट कॅप्टन होते, तर 35 वर्षांचे डेव्हिड जे. डॉड्स फर्स्ट पायलट होते. या विमानात चार फ्लाइट अटेंडंट आणि 149 प्रवासी होते. अपघातात 155 जणांचा मृत्यू झाला. चार वर्षांची एक मुलगी आश्चर्यकारपणे बचावली होती.
अपघातात मुलगी बाहेर फेकली गेली असावी आणि त्यामुळे ती आगीतून वाचली असावी, असं तपासकर्त्यांनी अहवालात म्हटले होतं. चुकीच्या फ्लॅपिंग आणि स्लॅट्स कॉन्फिगरेशनमुळे हा अपघात झाला होता. या दोन्ही क्रिया टेकऑफ आणि लँडिंगवेळी केल्या जातात.
विमानाने ताशी 200 मैल म्हणजे ताशी 310 किमी वेगाने उड्डाण केलं होतं. जमिनीपासून सुमारे 50 फूट (15 मीटर) उंचीवर पोहोचल्यानंतर ते एका बाजूला झुकलं. कारण, फ्लॅप योग्यरीत्या उघडले नाव्हते. विमानाचा डावा पंख धावपट्टीपासून 2,760 फूट (840 मीटर) अंतरावरच्या लाइट पोलला धडकला आणि आग लागली. विमान डावीकडे 90-अंशाच्या कोनात वळलं आणि एव्हिस कार रेंटल बिल्डिंगच्या छताला धडकलं. त्यानंतर अनियंत्रित झालेलं विमान मिडलबेल्ट रोडवर उलटं घसरत गेलं. नॉरफोक सदर्न रेल्वे ओव्हरपास आणि हायवे 94 ओव्हरपासवर विमानाचे अवशेष कोसळले होते.