दर्यापूरात नागरीकामध्ये भितीचे वातावरण चोरी, घरफोड्यांचे सत्र सुरुच
शहरातील सहकार नगरात घरफोडी, तीन लाखांचे सोने दागिने लंपास
दर्यापूर – कैलास कुलट
शहरातील सहकार नगरात चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
तयार झाले आहे. सहकार नगरातील गणेश टाले यांच्या बंद घराचा दरवाजा फोडून चोरट्यांनी तीन
लाखांचे दागिने पळविण्याची घटना (दि. 23) रोजी मध्यरात्रीच्यासुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गणेश टाले हे दि. 18 रवीवार रोजी दवाखान्याच्या कामानिमित्त नागपूरगेले असता चोरट्यांनी त्यांच्या
मुख्य दरवाजाची कडी तोडून प्रवेश केला व
घरात बेडरूममधील कपाटातील तीन लाखांचे दागिने लंपास केले. नगरवासीयांनी टाले
यांना चोरी झाल्याची माहिती देताच नागपूर येथून दर्यापूरकडे निघाले, व पोलिसांनी माहिती
दिली, याबाबतचा अधिक तपास दर्यापूर पोलीस
करीत आहेत. घरफोडीचे सत्र सुरू असल्याने
नागरिकांच्या किमती ऐवजांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे रात्रीला पोलिस गस्त वाढविण्याचीमागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.