राजकिय

इम्तियाज जलील यांची नवनीत राणांवर जहरी टीका 

Spread the love
नवनीत राणा यांना कव्हरेज देतो असे कोणी म्हणाले तर ती डान्स करायला देखील तयार होईल 
छत्रपती संभाजीनगर ( नवप्रहार डेस्क)
                     छत्रपती संभाजीनगर येथे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आलेल्या खा. नवनीत राणा यांच्या विरोधात खा. इम्तियाज जलील यांनी जहरी टीका केली आहे. त्यांनी नवनीत राणा यांना चीफ मेंटॅलिटीची बाई आणि कोणी जर कव्हरेज देतो अस म्हटलं तर ती नाचायला देखील तयार होईल अशी टीका केली आहे. 
 
खासदार नवनीत राणा (अमरावती) यांनी हैद्राबाद येथे ओवैसी बंधूंवर निशाणा साधत टीका केली होती. भाजप उमेदवार माधवी लता यांच्या समर्थनार्थ प्रचार सभेत त्यांनी एमआयएमवर प्रहार केला होता. यालाच आता खासदार इम्तियाज जलील  यांनी प्रत्युत्तर दिलंय.।छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील या तिन्ही प्रमुख उमेदवारांकडून आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.

काय म्हणाले इम्तियाज जलील

11 मे  एमआयएमच्या वतीने इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आल होते. या रॅलीत त्यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली. “भाजपने काही लोक हे भुंकण्यासाठी ठेवले आहेत, नवनीत राणा म्हणजे चिप मेंटॅलिटीची बाई आहे. याअगोदर हैदराबादचे आमदार भूंकण्यासाठी सोडले होते, आता तो संपलेला आहे, म्हणून ह्या बाईला सोडलं आहे.”, अशा शब्दांत इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे.

“तुमचा धर्म आहे याचा आम्ही आदर करतो, पण हनुमान चालीसा उद्धव ठाकरे यांच्या घरासमोरच का वाचायची होती. चीप पब्लिसिटी घेण्यासाठी ही कोणत्याही इशूला मोठं करते. जर तुम्ही तिला म्हणालात मी कव्हरेज देतो, तर ती डान्स करायला देखील तयार होईल”, असा टोला देखील यावेळी इम्तियाज जलील यांनी नवनीत राणा यांना लगावला.

पुढे ते म्हणाले की, “ओवैसी साहेब चार टर्म खासदार राहिलेले आहेत, त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळालाय. पण, नवीन आलेल्या बाईला काही कळत नाही”, अशी टीका देखील इम्तियाज जलील यांनी केली आहे.

यांनी ओवैसी बंधूंना इशारा दिला होता. “एक धाकटा आणि एक मोठा भाऊ आहे. त्यातला धाकटा भाऊ म्हणतो की, पोलिसांना 15 मिनिटांसाठी हटवलं तर आम्ही काय करू शकतो, हे दाखवून देऊ. त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की, तुम्ही 15 मिनिटं मागता. पण आम्हाला 15 सेकंद पुरेसे आहेत. 15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवा, मग आम्ही काय ते सांगतो. ओवैसी बंधूंना कुठून आले आणि कुठे गायब झाले हे कळणारही नाही.”, असं नवनीत राणा म्हणाल्या होत्या.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close