तांत्रिक कामगारांना स्वतंत्र वेतनश्रेणी लागू करा – रवि बारई
लाखनी (भंडारा )/ प्रतिनिधी
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन या संघटने तर्फे ४६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दि.०८/०९/२०२३ ला बडगे सेलेब्रेशन हॉल, लाखनी येथे संघटनेच्या वतीने भंडारा, गोंदिया जिल्हास्तरीय भव्य तांत्रिक कामगार मेळावा, रक्तदान शिबीर, स्वछता अभियान, वृक्षारोपण तसेच एकपात्री नाट्यप्रयोग “चुकीला माफी नाहीच….” अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.* *कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा भंडारा गोंदिया जिल्हा माजी पालकमंत्री श्री. परिणय फुके हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन चे केंद्रीय अध्यक्ष श्री रवीदादा बारई, प्रमुख पाहुणे म्हणून श्री शैलेंद्र अर्जितवार केंद्रीय उपाध्यक्ष विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन,श्री गजानन जयस्वाल अधीक्षक अभियंता भंडारा, सौ. स्मिता पारखी कार्यकारी अभियंता साकोली, श्री आनंद जैन कार्यकारी अभियंता गोंदिया, श्री किशोर फाले कामगार कल्याण विश्वस्त, श्री रवि वैद्य,श्री सेवकराम बांगडे, श्री गोवर्धन मारबते,श्री रोशन पटले, श्री नरेंद्र तिजारे, श्री रमेश महरवड, श्री.अमित शहारे, श्री गोस्वामी, श्री आनंद राघळवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.*
*यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन, ध्वजारोहन व रक्तदान शिबिराचे उदघाटन श्री परिणय फुके माजी पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.*
*आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना केंद्रीय अध्यक्ष श्री रवि बारई यांनी संघटनेची यशस्वी वाटचाल, कामगारांचे प्रश्न, व भविष्यातील वाटचाल, संघटनेतर्फे घेण्यात येत असलेले सामाजिक उपक्रम, संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन झालेले १५००० च्या वर रक्तदान यावर विस्तृत मार्गदर्शन केले.* *त्याचबरोबर आपल्या संबोधनात त्यांनी विज क्षेत्रातील तांत्रिक कामगारांना विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन ने रिस्क अलाउन्स, फ्रिज बेनिफिट, अधिकच्या सुट्ट्या व इतर अनेक फायदे मिळवून दिले याच बरोबर २००५ ला तांत्रिक कामगारांना दोन अधिकच्या वेतनवाढी मिळवून देण्याचे पूर्ण श्रेय हे फक्त आणि फक्त विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन चे च आहे. आपल्या भाषणात पुढे बोलतांना ते म्हणाले की महाराष्ट्र शासनाच्या अख्त्यारितील विज कंपन्याची २०२३ ते २०२८ या कालावधी ची पगारवाढ प्रलंबित आहे ती लवकर लागू करावी, विज कर्मचाऱ्यांना ३५% पगारवाढ द्यावी, तांत्रिक कामगारांना स्वतंत्र वेतन श्रेणी लागू करावी, लाईनस्टाफ़ च्या इंधन भत्यात वाढ करावी अश्या अनेक मागण्या त्यांनी संघटनेच्या वतीने मांडल्या.*
*कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे श्री परिणय फुके, माजी पालकमंत्री यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की महाराष्ट्राच्या विकासासाठी ऊर्जा विभाग हा महत्वाचा असून या संवेदनशील क्षेत्रात काम करणारा विज कर्मचारी हा महत्वाचा घटक आहे त्यामुळे विज कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विजकर्मचाऱ्यांचा प्रश्नाबाबत व त्यांच्या न्यायपूर्ण मागण्याबाबत सकारात्मक विचार करून आपल्या मार्फत उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पाठपुरावा करण्यात येईल व त्या १००% निकाली काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येईल.*
*यावेळी त्यांनी संघटनेच्या कार्यप्रणाली ची व राबवत असलेल्या उपक्रमाची प्रशंशा केली.* *यावेळी भंडारा, गोंदिया विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन तर्फे पगारवाढ प्रस्तावाची प्रत देण्यात आली.*
*कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे श्री गजानन जयस्वाल यांनी महावितरण मध्ये काम करतांना विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेचे नेहमीच सहकार्य प्रशासनाला लाभत असते.* *महाराष्ट्राच्या ऊर्जाक्षेत्रातील विज कंपन्याच्या प्रगतीत विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन चा सिंहाचा वाटा असून प्रशासनाला संघटनेची नेहमीच मदत मिळत असते.* *व कामगारांच्या प्रश्नासोबतच विज उद्योग टिकला पाहिजे व त्याची भरभराट झाल्या पाहिजे यासाठी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन नेहमीच प्रयत्नशील राहिली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.*
*यावेळी कार्यकारी अभियंता सौ. स्मिता पारखी, श्री शैलेन्द्र अर्जितवार, श्री किशोर फाले,श्री. रवींद्र वैद्य, श्री. रोशन पटले आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.*
*कार्यक्रमात सुरक्षा व प्रशिक्षण केंद्र एकलहरे नाशिक निर्मित एकपात्री नाटक “चुकीला माफी नाहीच ” या एकपात्री सुरक्षा नाट्यप्रयोगाचे सादरीकरण श्री. संदीप पाचंगे यांनी केले.*
*यावेळी तांत्रिक कामगार युनियन च्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इतर संघटनेतील ३३ कामगारांनी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन मध्ये जाहीर प्रवेश केला.*
*संघटनेच्या वतीने अत्यंत जोखीमीच्या विज क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला* *त्याचबरोबर ३३के. व्ही. डव्वा उपकेंद्र देवरी विभाग येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान कार्यक्रम घेण्यात आला. रक्तदान शिबिरात ३३ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन रहांगडाले यांनी केले, तर आभार श्री सुखदेव रहांगडाले यांनी मानले. कार्यक्रमाला भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील* *महावितरण व महापारेषण मधील तांत्रिक कामगार शेकडोच्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भंडारा, गोंदिया विभाग, मंडळ, परिमंडळ कार्यकारिणी महावितरण व महापारेषण यांनी परिश्रम घेतले.*