क्राइम

डॉक्टर राठी यांच्यावर हल्ल्यामागे अनैतिक संबंध ? 

Spread the love

नाशिक  / नवप्रहार मीडिया 

                        नाशिक येथील सुयोग हॉस्पिटल चे संचालक डॉ.कैलास राठी यांच्यावर शुक्रवारी कोयत्याने सपासप वार करत प्राणघातक हल्ला करम्यात आला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.” 

या हल्ल्यानंतर अज्ञाताने तिथून पळ काढला होता. आता या हल्ल्याचे कारण धक्कादायक समोर आलं आहे. तसेच आरोपीने डॉक्टरवर हल्ला केल्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. दुसरीकडे या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक शहरात रुग्णालये बंद ठेवण्याचा निर्णय देखील मागे घेण्यात आला आहे.

डॉक्टर कैलास राठी यांच्यावरील हल्ल्याचे धक्कादायक सीसीटीव्ही आता समोर आलं आहे. अज्ञात आरोपीने डॉक्टर राठी यांच्यावर कोयत्याने सपासप वार केल्याचे समोर आलं आहे. या घटनेत डॉक्टर राठी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्याचे कारण डॉक्टर आणि कर्मचारी महिलेचे अनैतिक संबंध असल्याचे समोर येत आहे. या हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. आरोपीने कोयत्याने डॉ. कैलास राठी यांच्यावर जवळपास 18 वार केले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close