शाशकीय
अवैध्यरित्या रेती वाहतूक करणारा ट्रक ताब्यात
घाटंजी तहसिलदाराची अवैध्य रेतीवाल्यावर धडक्क कार्यवाही
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
सध्या घाटंजी तहसिलदाराची अवैध्य रेती उपसा व रेती विक्री करणाऱ्यावर करडी नजर असून कोळी येथिल नद्दीचे रेतीचा अवैध्य उपसा करणाऱ्यांची धाब्बे दणानले आहे. दि.०७/०९/२०२३ रोजी रात्री १०.३२ चे सूमरास घाटंजी तहसिलचे तहसिलदार मा. विजय साळवे यांनी मौजा कोळी,येथे अवैध रेती वाहतूक करनारा ट्रक क्र .MH04 DK 2236 या क्रमांकाचा ट्रॅक अवैध्य विनापरवाना रेती भरुलेला असल्याचे माहिती मिळाली त्यावर कार्यवाही करत विनापरवाना रेती उत्खनन व वाहतूक करत असतांना ट्रक ताब्यात घेतला तसेच पुढील कारवाई साठी पोलीस स्टेशन घाटंजी येथे लावण्यात आला. सदर कारवाई करते वेळी मंडळ अधिकारी अनील येरकार,तलाठी आर.जी राठोड ,चालक अभी तिवारी उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1