क्राइम

अवैधरित्या अग्नीशस्त्र, घातक शस्त्र व काडतुस बाळगणाऱ्या आरोपीस अटक.

Spread the love

कळमणा पोलीसांची कामगिरी 

नागपूर / अमित वानखडे

अवैधरित्या अग्नीशस्त्र, घातक शस्त्र व काडतुस बाळगणाऱ्या आरोपीस अटक. १,२९,६९५ /- रू. चा शस्त्रसाठा जप्त. दिनांक २२.०६.२३ चे २३.४५ वा. चे दरम्यान कळमणा पोलीसांना पोलीस नियंत्रण कक्ष डायल ११२

वरून व त्यांना मिळालेले खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन आरोपी रमानंद रघुनाथ धुर्वे वय २७ वर्ष रा. प्लॉ. नं. ३७ वैष्णोदेवि नगर, शिवशक्ती बारचे मागे कळमणा येथे पंचासह रेड कारवाई केली असता आरोपीचे वरून १) अग्नीशस्त्र – ०५ नग ( देशीकट्टे ४ व एअरगण १), २) कारतुस १९ नग, ३) लोखंडी तलवार ०३नग, ४) लोखंडी चाकु -०२ नग, ५) भाल्याचा पाता – ०१ नग, ६) लोखंडी फायटर ०१ नग, ७) लोखंड साफ करण्याचा स्प्रे १ नग, ८) गॅस सिलेंडर २ नग, ९) लहान बॉक्स बारूद भरलेले ४ नग, १०) एअरगणचे १०८ छरे असलेला ०१ बॉक्स, असा एकुण किंमती अंदाजे १,२९,६९५ / रूचा मुद्देमाल अवैधरित्या मिळुन आला. तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला. आरोपीने मा. सह पोलीस आयुक्त साहेब यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने आरोपीचे हे कृत्य कलम ३, ४, २५, भारतीय हत्यार कायदा सहकलम १३५ म.पो. का. अन्वये होत असल्याने आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करून पुढील तपास सपोनि अमोल तांबे हे करीत आहे.

वरील कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार साहेब, सह पोलीस आयुक्त श्रीमती अश्वती दोरजे,
अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संजय पाटील, अप्पर पो आयुक्त श्री प्रमोदकुमार शेवाळे ( उत्तर प्रादेशिक विभाग),
पो. उपायुक्त परी ५ श्री श्रवण दत्त, सहा. पो. आयुक्त श्री. संतोष खांडेकर यांचे मार्गदर्शनाखाली व.पो. नि. श्री. देवेंद्र
ठाकुर, पोनि (गुन्हे) विश्वास पुल्लरवार, सपोनि अमोल तांबे, पोउपनि देवानंद मोरे, पोहवा, चंद्रशेखर यादव, नापोअ
प्रदीपकुमार द्या, पोअ संतोष परतेकी यांनी केली.

गुन्हे शाखा युनिट क्र. ०१ पोलीसांची कामगिरी :- हद्दपार इसमास घातक शस्त्रासह अटक.

दिनांक २२.०६.२३ चे १९.४५ वा. ते २०.४५ वा. चे दरम्यान गुन्हे शाखा युनिट क्र. ०१ चे अधिकारी व अमलदार हे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशिर माहीती वरून सम्राट अशोक नगर,
सार्वजनिक रोडवर, वाडी, नागपुर येथे हद्दपार आरोपी इसम निलेश उर्फ छोटु ज्ञानेश्वर गवई, वय २३ वर्षे, रा. रामजी आंबेडकर नगर, ८ वा मैल, वार्ड नं. ०४, वाडी, नागपुर हा रोडवर हातात लोखंडी तलवार घेवुन कुठेतरी एखादा दखलपात्र गुन्हा करण्याचे तयारीत असताना त्याला पोलीसांची चाहुल लागताच पळुन जाण्याचे तयारीत असतांना, त्यांस सोबत पो. स्टाफ चे मार्फतीने ताब्यात घेण्यात आले. व त्याचे जवळील लोखंडी तलवार ताब्यात घेवुन जप्त करण्यात आली. आरोपीचे हे कृत्य कलम १४२, १३५, महा. पो. कायदा, सहकलम ४,२५ भाहका अन्वये होत असल्याने त्यांस पुढील कार्यवाही हेतु पो. ठाणे वाडी यांचे सुपुर्द करण्यात आले.
सदरील कामगिरी युनिट क ०१ चे वपोनि शुभांगी देशमुख यांचे मार्गदर्शनात पोउपनि दिपक ठाकरे, पोहवा… बबन राऊत, नितिन वासनिक, नापोअ हेमंत लोणारे, मनोज टेकाम, रितेश तुमडाम, पोअं. रवि राऊत, शिवशंकर रोठे, नितिन बोलकर यानी केली. – नागपुर प्रतिनिधी अमित वानखडे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close