क्राइम
अवैध रेती वाहतूक करणा-या दोघाविरूद गुन्हा दाखल
वरूड/तूषार अकर्ते
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून शहरातील स्मशानभूमीजवळ दुपारच्या दरम्यान नाकाबंदी केली असता महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर मुंडा क्रमांक एम एच ३२ ए ६१४० व लाल रंगाची ट्रॉली क्रमांक एम एच २७ यु २९६० यामध्ये विनापरवाना अवैध गोणखणीज रेती वाहतूक करीत होता. सदर ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये एक ब्रास रेतीचा माल मिळुन आल्याने फिर्यादी पोलिस उपनिरिक्षक मंगेश शेगोकार यांच्या तक्रारीवरून सुख नंदन सुकलाल मुंगरकर (३२) रा.आमला जि.बैतुल (म.प्र) , शकिल शहा रा.वरूड या दोन्ही आरोपी विरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1