हटके

पती समजून ती ज्याच्या कुशीत झोपली तो निघाला भलताच

Spread the love

भदोही / नवप्रहार डेस्क .

                 उत्तरप्रदेश च्या भदोहीं येथून एक भलतच प्रकरण समोर आलं आहे. पती समजून ती ज्याच्या कुशीत झोपली होती तो पती नव्हे तर शेजारी राहणारा युवक निघाला.तिला समजे पर्यंत त्यांच्यात पती पत्नी सारखे सगळं काही झालं होतं. या बाबत ती पोलिसात तक्रार दाखल करयाला गेली. पण पोलिसांनी तिला हाकलून लावले. शेवटी तिने न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर न्यायालयाने आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.या प्रकरणातल्या आरोपीसह त्याचे दोन्ही भाऊ फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

                 त्याच झालं असं की , विवाहिता आपल्या खोलीत आराम करत होती. दरम्यान लाईन गेल्याने अंधार झाला। याच अंधाराच फायदा घेत शेजारील युवक तिच्या बेडरूम मध्ये घुसला. आणि तिच्या शेजारी येउन झोपला. शेजारी पती झोपला आहे असे समजून ती त्याच्या कुशीत झोपी गेली. पण तरुण तिच्याशी अश्लील चाळे करत असल्याने तिने त्याला धक्का देऊन पाडले. तिला शंका आली इतक्यात लाईट देखील आली. जेव्हा बाजूला झोपलेला व्यक्ती आपला पती नसून शेजारील कंचू असल्याचे समजल्याने तिने आरडाओरड केली. त्यामुळे कुटुंबातील लोक आणि शेजारी जमा झाले. त्यांनी कांवहू5 ला।पकडून ठेवले. पण तितक्यात त्याचे दोन भाऊ आले आणि त्यांनी त्याला सोडून नेले.

गोपीगंज पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. 34 वर्षांच्या विवाहित महिलेने याबाबत माहिती देताना सांगितलं, की ’17/18 जुलै रोजी रात्रीच्या वेळी घरातला वीजपुरवठा खंडित झाला होता. त्या वेळी शेजारी राहणारा कंचू (वय 32) चोरून घरात घुसला. त्याची कोणालाही चाहूल लागली नाही.

पीडित महिलेने आरोपीला पकडून ठेवलं होतं. लोकांनी त्याला मारहाण केली. पोलिसांना प्रकरणाची माहिती दिली. यादरम्यान गमई आणि बोरा हे कंचूचे दोन्ही भाऊ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेला शिवीगाळ केली. पोलीस दाखल होण्यापूर्वीच तिघेही घटनास्थळावरून फरार झाले.

‘मी पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी माहिती दिली; पण मला पोलीस स्टेशनमधून हाकलून देण्यात आलं,’ असा आरोप पीडित महिलेनं केला. प्रकरणाची कोणीच दखल घेत नसल्याने सात ऑगस्टला तिने मुख्य न्यायदंडाधिकारी सबीहा खातून यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने आरोपी कंचूविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. सध्या आरोपी आणि त्याचे दोन्ही भाऊ फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
2
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close